Posts

Showing posts from February 18, 2020

महिलेची गळफास लावून आत्‍महत्या

महिलेची गळफास लावून आत्‍महत्या  गळफास लावून आत्‍महत्या वसमत - तालुक्‍यातील बाभुळगाव येथील एका अल्‍पभुधारक महिलेने नापीकीला कंटाळून मंगळवारी (ता.18) सकाळी पाचच्या सुमारास गळफास घेवून आत्‍महत्या केल्याची घटना घडली.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्‍यातील बाभुळगाव येथील द्रौपदाबाई गोपीनाथ मगर (वय 40) या अल्‍पभुधारक शेतकरी होत्या तसेच त्‍या दिव्यांग होत्या त्याच्याकडे साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. यांच्यावर त्‍याच्या कुटूंबीयाचा उदरनिर्वाह होत होता. सततच्या नापीकीमुळे संसारात अडचणी येत आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी व पुढे होणाऱ्या लग्नसाठी लागणारा खर्च कसा करावा या विवंचनेत त्या सापडल्या होत्या. दरम्‍यान, मंगळवार सकाळी पाचच्या सुमारास त्‍यांनी स्‍वतःच्या घरी गळफास घेवून आत्‍महत्या केली. या बाबत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाणी पुरवठा विहीरीच्या कामासाठी २५ एप्रीलची डेड लाईन हिंगोली पाणी टंचाईची बैठक

पाणी पुरवठा विहीरीच्या कामासाठी २५ एप्रीलची डेड लाईन   हिंगोली पाणी टंचाईची बैठक, आमदार मुटकुळे, बांगर यांची उपस्‍थिती   हिंगोली - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत तालुक्‍यात 130 सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीची कामे सुरू असून ही कामे तातडीने 25 एप्रील अखेर पुर्ण करण्याच्या सुचना आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.18) सुखदा मंगल कार्यालयात झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत दिल्या.    यावेळी आमदार मुटकुळे यांच्यासह आमदार संतोष बांगर, जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई झुळझुळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, गटविकास अधीकारी डॉ. मिलींद पोहरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे, मुकुंद कारेगावकर यांच्यासह पंचायत समिती, जिल्‍हा परिषद सदस्य विज वितरणचे अधिकारी यांची उपस्‍थिती होती.    या बैठकीत मागील वर्षाचा पाणी टंचाईचा आढावा घेत चालु वर्षाच्या मंजूर आराखड्याचे वाचन करण्यात आले. यावेळी आमदार मुटमुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मंजूर आराखड्याची तात्‍काळ अमंलबजावणी करण्...

लिगो प्रकल्‍पाकडे जमीनीचे हस्‍तांतरण वैज्ञानिकाचे निवासस्‍थाने उभारणीचे काम लवकरच

लिगो प्रकल्‍पाकडे जमीनीचे हस्‍तांतरण    वैज्ञानिकाचे निवासस्‍थाने उभारणीचे काम लवकरच   हिंगोली - तालुक्‍यातील जामवाडी भागातील सात हेक्‍टर ऐंशी आर जमीन मंगळवारी (ता.18) शासनाने अनुउर्जा विभागाचे अधिकाऱ्याकडे लिगो प्रकल्‍पाची जमीन हस्‍तातंरीत केली आहे. यामुळे वैज्ञानिकाच्या निवासस्‍थाचा मार्ग मोकळा झाला आहे.    औंढा तालुक्‍यातील दुधाळा परिसरात भुर्गभातील लहरीचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पहिली व जागतीक स्‍तरावील तीसरी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्‍याचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. मागच्या तीन ते चार वर्षापासून जमीन हस्‍तांतराचे काम सुर आहेत. यात शासकिय जमीन, वनविभाग व खाजगी अशी एकून 183 हेक्‍टर जमीन या प्रकल्‍पासाठी देण्यात आले असून त्याचा मावेजा देखील लाभार्थ्याना देण्यात आला आहे.   दरम्यान, मंगळवारी हिंगोली तालुक्‍यातील जामवाडी शिवारातील गट क्रमांक 36 मधील बारा हेक्‍टर सोळा आर या पैकी सात हेक्‍टर ऐंशी आर जमीन ज्याची चतुसिमा पुर्वेस गट क्रमांक 32, 35. 37 तर पश्चीमेस व दक्षिणेस लिंबाळा जामवाडी शिवरास्‍ता, उतरेस गट क्रमांक 36 ची शिल्‍लक ...

नागनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

Image
महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला औंढा येथील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर फुलून गेला आहे. (छाया- दत्तात्रय शेगुकर)