Posts

Showing posts from February 16, 2020

घरकुल बांधकामात हिंगोली जिल्हा परिषद विभागात दुसऱ्या क्रमांकावर

घरकुल बांधकामात हिंगोली जिल्हा परिषद विभागात दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात तिसऱ्या स्थानी हिंगोली - जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्‍ह्‍यात१६-१७ ते १९-२० घरकुल योजनेमध्ये शुक्रवार अखेर ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विभागातून दुसऱ्या क्रमांकावर घरकुल बांधकामात मजल मारली आहे. तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ७२ टक्के काम पूर्ण झाल्याने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेची कामे केली जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्‍ह्‍याला सहा हजार ९७८  घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यानुसार शुक्रवार (ता.१४) अखेर पाच हजार०४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित एक हजार ९३३ घरकुलाचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये औंढा तालुक्‍यात २९४, वसमत तालुक्‍यात ४५४, हिंगोली २६०, कळमनुरी  ३४८, सेनगाव तालुक्‍यात ५८९ बांधकामे अपूर्ण आहेत.ज्याची टक्केवारी ७२एवढी आहे. तरी देखील पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत राज्यात हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात तिसऱ्या क्रम...

सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्याकडून जीपत पेंडिंग काम सुरू

सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्याकडून जीपत पेंडिंग काम सुरू हिंगोली - रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही काही विभागात कर्मचारी पेंडिंग कामे करीत बसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, प्राथमिक शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन, लघु सिंचन विभाग,पशु विभागात कर्मचारी पेंडिंग कामे करीत होते. तर लघु सिंचन विभागात कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे यांनी देखील रविवारी सुट्टीच्या दिवशी ही कामे बसले होते.राज्य शासनाने  पाच दिवसाच्या आठवाड्यास मंजुरी दिल्याने आता २९ फेब्रुवारी पासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना दिलासा मिळाला असला तरी प्रशासकीय कामाचा निपटारा करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱयांना मोठी कसरत करावी लागणार आहे.आताच शनिवारी आणि रविवारी सुट्टी असली तरी देखील काही कर्मचारी सुट्टीच्या दिवशी ही रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी कार्यालयात येत आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा जरी केला तरी देखील कर्मचारी पेंडीग कामे करण्यासाठी धावपळ करावी लागणारच आहे. झिरो पेंडंसी साठी अधिकारी, कर्मचाऱ्यानी गत वर्षी बैठका घेऊन कामे निपटारा करण्यासाठी प्रयत्न केले होते. पुन्हा पाहिले पाढे...