Posts

Showing posts from February 14, 2020

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल   हिंगोली - सूर्यवंशी कुठे आहेत, असे विचारत अर्जावर शिक्का दे व मोबाईल नंबर देता का नाही असे म्हणत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नगरपालिकेत कर्मचारी काम करीत असताना, आरोपी महमूद अमिरखान,फरहीन महेमुद राहणार रिसाला बाजार मोठी मस्जिद यांनी दुपारी तीन ते चारच्या सुमारास पालिकेत कोणता तरी अर्ज घेऊन आले होते. यावेळी या दोघांनी सूर्यवंशी कुठे आहेत ,असे म्हणून अर्जावर शिक्का दे, मोबाईल नंबर देता का नाही म्हणून शिवीगाळ करून त्या ठिकाणी पडलेला प्लायवूडचा तुकडा हातात घेत लिपिक शिवाजी घुगे (वय४३)यांच्या अंगावर उगारला असता तेवढ्यात शेख साजिद शेख दौलत याने त्याच्या हाताला धरून मारत असताना रोखल्याने हाणामारी ची घटना टळली.परंतु या दोघांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात कर्तव्य पार पाडत असताना कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिसात शिवाजी उत्तरामराव घुगे यांच्या फिर्यादीवरून शुक्...

रांगड्या मातीतील ‘केसरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Image
रांगड्या मातीतील ‘केसरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित   अनिल चौधरी,पुणे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेच्या आगामी ‘केसरी – saffron’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा ऐकायाला मिळतेय. कुस्ती या मराठी मातीतील खेळाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. भावना फिल्म्स एलएलपी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत ‘केसरी – saffron’ च्या ट्रेलर मध्ये एका सामान्य मुलाची संघर्षगाथा असल्याचे दिसते. चित्रपटाच्या नायकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्याने कुस्ती खेळण्यास त्याच्या वडिलांचा विरोध आहे. काही कारणांनी गावातील लोक सुद्धा त्याच्या विरोधात असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ‘मी घरात तेव्हाच पाउल टाकीन जेव्हा खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा असेल’, असा निर्धार नायक करतो. मातीतल्या कुस्तीच्या आखाड्यात उतरायचे असेल तर आजच्या काळात पहिलवानाला महिन्याला किमान ४० – ५० हजार रुपये खर्च येतो अशा काळात सामान्य घरातील मुलगा आपल्या ध्येय...

कासारवाडा येथून दहा लाखाचे  दागिने पळविले

Image
कासारवाडा येथून दहा लाखाचे  दागिने पळविले   हिंगोली - घरातील ब्याग कापून त्यातील ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा एक डबा त्यात२६७ग्रॅम८००मिलिग्राम अंदाजे दहा लाख७६हजार२०रुपयांचे दागिने पळविल्याची घटना१०फेब्रुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली असून गुरुवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कासारवाडा येथील प्रदीप उपाध्ये हे खाजगी नोकरी करीत आहेत. त्यांनी घरात एका ब्यागेत सोन्याच्या दागिन्यांचा एक डब्बा ठेवला होता. त्यामध्ये २६७ ग्रॅम ८०० मिलिग्राम असा एकूण  दहा लाख ७६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने सोमवारी (ता.१०ते ११)रोजी रात्री सवा नऊच्या सुमारास पळविले आहे. गुरुवारी उपाध्ये यांनी पाहताच घरातून दागिने पळविल्याचे उघडकीस येताच त्यांनी शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केनेकर करीत आहेत.        

लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत कर्मचारी मेळावा

लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत कर्मचारी मेळावा लिंगायत आयडॉल राज्य पुरस्काराचे वितरण लातूर ः लिंगायत महासंघ महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष व महात्मा बसवेश्‍वर चित्रपटाचे निर्माते प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 29 मार्च 2020 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे लिंगायत कर्मचारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगायत समाजातील सर्व वरिष्ठ पातळीपासून चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपर्यंत, शाळा, महाविद्यालय, कारखान्यातील कामगार, असंघटीत कर्मचारी, कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कर्मचार्‍यांची नोंदी येथे केल्या जाणार आहेत. समाजाच्या विविध प्रश्‍नांवर कर्मचार्‍यांमध्ये जागृती व त्यांचे मार्गदर्शन घेण्यापासून ते त्यांचा सामाजिक  क्षेत्रात सहभाग वाढवावा म्हणून हा लिंगायत कर्मचारी मेळावा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष तथा महात्मा बसवेश्‍वर चित्रपटाचे निर्माते प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या मेळाव्यासाठी लिंगायत समाजातील अनेक वरिष्ठ अधिकारी, धर्मगुरू व काही होतकरू अधिकारी यांची उपस्थिती लाभणार असून या ...

हिंगोली संघाने नेत्रदीपक कामगिरी करीत चषक स्विकारताना खेळाडू

Image
लातूर येथील विभागीय महसूल क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत  हिंगोली संघाने नेत्रदीपक कामगिरी करीत चषक स्विकारताना खेळाडू विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत हिंगोली संघाने विभागातून दुसरा क्रमांक पटकावला      

तब्बल दोन वर्षानंतर हिंगोली पुरवठा विभागाला मिळाला कायमस्वरूपी अधिकारी

Image
अरुणा संगेवार नवे जिल्हा पुरवठा अधिकारी     हिंगोली - राज्यातील जानेवारी महिन्यात उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नत्या झाल्या त्यात लातूर येथील तहसीलदार अरुणा संगेवार यांची हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. मात्र त्या रजेवर गेल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) त्यांनी पदभार घेताच गोविंद रणवीरकर यांनी पदभार देऊन स्वागत केले.    जिल्हा पुरवठा विभागाला तब्बल दोन वर्षानंतर कायमस्वरूपी अधिकारी मिळाल्याने आता कामे मार्गी लागतील अशी आशा रास्तभाव दुकान दारांना लागली आहे. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांच्या रिक्त जागी प्रभारी म्हणून उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता. त्यानंतर बांगडे यांनी सहा महिने पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांनीही यवतमाळ येथे बदली करून गेल्याने पुन्हा हा विभाग प्रभारीवरच आला. पुन्हा  रणवीरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देऊन पुरवठा विभागाचा डोलहारा सांभाळला. अखेर उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नत्या झाल्याने लातूर येथील तहसीलदार अरुणा संगेवार यांना पदोन्...

शिवजयंतीनिमित्त आजपासून क्रिडा महोत्सवाला सुरुवात

Image
  लाखोंची बक्षीसे, जय्यत तयारी   हिंगोली / प्रतिनिधी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने पाच दिवशीय शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हॉलीबॉल स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रिडा स्पर्धा १५ फेबु्रवारीपासून सुरु होणार असून लाखो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.    सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पाच दिवशीय छत्रपती उत्सव साजरा करण्यात येत आहे.  १५ रोजी येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय पारितोषिक सात हजार, तृतीय पारितोषिक पाच हजार बक्षीस ठेवण्यात आले आहे.  १६ रोजी सकाळी ११ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय७ हजार, तृतीय ४ हजार, चतुर्थ ४ हजार व सन्मानचिन्ह तर महिला गटासाठी प्रथम सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय २ हजार ५००, चतुर्थ २ हजार ५०० व सन्मानच...

पालिकेची प्लास्टिकबंदी मोहीम  २१५किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त,एक लाखाचा दंड वसूल

Image
पालिकेची प्लास्टिकबंदी मोहीम       प्लास्टिक 215 किलो जप्त, एक लाखाचा दंड वसूल   हिंगोली - येथील पालिकेतर्फे शहरात शुक्रवारी  प्लॉस्‍टीक बंदी बाबत धडक मोहिम राबवत मुख्य बाजारपेठेतील साठ दुकानाची तपासणी करून २१५ किलोग्रॅम (दिड टिप्‍पर भरून) ऐवढे प्लॉस्‍टीक जप्त करून १ लाख १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.     हिंगोली पालिके तर्फे महाराष्‍ट्र प्लॉस्‍टीक व थर्माकॉल अविघटनाशील वस्‍तूचे अधिसुचना २०१८ अन्वये बंदी घालण्यात आलेल्या प्लॉस्‍टीक साहित्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बाबत वारंवार शहरातील व्यापारी, नागरीक, विविध आस्‍थापणा यांना वेळोवेळी अवगत करण्यात आलेले आहे. परंतू त्‍यानंतरही शहरातील काही व्यापारी बंदी घालण्यात आलेल्या प्लॉस्‍टीक साहित्याचा सर्रासपणे वापर, साठवणूक, विक्री, वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पथकामार्फत मुख्य बाजारपेठेत अचानक धाड टाकून जवळपास पन्नास ते साठ एवढ्या दुकानाची तपासणी केली.    सदर तपासणीत एकूण २३ दुकानदाराकडे बंदी घालण्यात आलेले अंदाजे २...

हिंगणी येथे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा

    हिंगणी येथे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा   हिंगोली - तालुक्‍यातील हिंगणी येथे बौध्द विहारात भिम गीते का लावता या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुरूवारी (ता.१३) गुन्हा दाखल झाला आहे.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या हिंगोली तालुक्‍यातील हिंगणी येथे रविवारी (ता.९) रात्रीच्या वेळी बौध्द विहारात भिम गीते का लावता या कारणावरून वाद करून भिमगीते बंद करून आश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी व चापटाने मारहाण करून विनयभंग केल्याची फिर्याद अनिता सरतापे यांनी केली असून त्‍यांच्या फिर्यादीवरून हरिहर घुगे, प्रकाश घुगे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली शहर हे  करीत आहेत.   जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा   हिंगोली - तालुक्‍यातील हिंगणी येथील एका दुसऱ्या घटनेत गुरूवारी (ता.१३) दुपारी संतोष घुगे यांच्या आखाड्यावर संतोष घुगे, बाळू घुगे यांनी प्रकाश हनवते याला संगमत करून पुर्वी बौध्द विहारात झालेल्या वादावरून चिडून दग...

सिद्धेश्वर यात्रा महोत्सव  प्लास्टिक मुक्त व्हावा 

Image
सिद्धेश्वर यात्रा महोत्सव  प्लास्टिक मुक्त व्हावा   रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन    यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना    लातूर /प्रतिनिधी :शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव सुरू होत आहे . यावर्षीची यात्रा प्लास्टिक मुक्त व्हावी तसेच यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल्या . यात्रा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल विविध सूचना करत हा महोत्सव लातूरच्या लौकिकाला साजेसा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या .     यात्रा महोत्सवाच्या तयारीबाबात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जी श्रीकांत बोलत होते . या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर , अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे , देवस्थानच्या प्रशासक श्रीमती यु एस पाटील, माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे संचालक विक्रम गोजमगुंडे , मनपा सहआयुक्त संभाजी वाघमारे ...

कळमनुरीत  गॅस सिलेंडरवर अंत्यसंस्कार

Image
कळमनुरीत  गॅस सिलेंडरवर अंत्यसंस्कार   भाववाढ झाल्याचा नागरिकांतून संताप कळमनुरी-  केंद्र सरकारने  पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत  महिलांना योगदान म्हणून गॅस मोफत दिला .परंतु  आता सिलेंडरचे भाव वाढल्याने नागरिकांनी दर वाढीचा संताप व्यक्त करीत ग्यास सिलेंडरवर अंत्यसंस्कार करून टाकी कचरा कुंडीत फेकून शासनाचा जाहीर निषेध केला.     केंद्र सरकारने घरगुती,व्यवसायिक ग्यास सिलेंडर मध्ये दर वाढ केल्याने आता तीच टाकी किमान आठशे ते नऊसे रुपयांच्या घरात जात आहे. त्यामुळे सामान्य, आणि गोरगरीब नागरिकां परवडणारे नाही. शासनाने सामान्य नागरिकांची दिशाभूल केली असून कळमनुरी मध्ये सिलेंडरची पूजा करून टाकीचा अंत्यविधी काढून कचरा कुंडीत फेकुन निषेध केला. यावेळी अजीस खा पठाण,राजू कांबळे,शेख अफझल,शोएब लाला,जाबेर ,शेख, सोहेल,आसेफ नाईक,संज्जू पठाण, आदी नागरिक उपस्थित होते.