Posts

Showing posts from February 13, 2020

सर्वसामन्यांचे जेवण महागले ! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांची घसघशीत वाढ

Image
सर्वसामन्यांचे जेवण महागणार! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांनी वाढ, असे आहेत मुंबईतले आजचे दर आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी :  गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.

सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा

Image
सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या   बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा                                                                                -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत *एकही पात्र शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये *जिल्हयात 72 हजार 6 शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र *अन जिल्हाधिकारी यांनी खातेदारांशी संपर्क करुन आधार क्रमांक मागितला.               लातूर,दि.13:-राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहिर केलेली असून या अंतर्गत 2 लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे. लातूर जिल्हयातील सर्व बँकांकडे 2 लाख मर्यादेपर्यंतचे 72 हजार 6 शेतकरी खातेदार या योजनेस पात्र आहेत.यातील 69 हजार 236 शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी  त्यांचा आधार क्रमांक लिंक...

बेरोजगारांसाठी लातूर येथे 16फेब्रुवारी 2020 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
*नामांकित कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेण्यांसाठी येणार                               लातूर,दि.13:-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, लातूर तथा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र लातूर व सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील उद्योजक/कंपनी यांचेकडील विविध पदे भरण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, क्रिडा संकूल औसा रोड, लातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.             या रोजगार मेळाव्यात 1. धूत ट्रान्समिशन प्रा. लि. चाकण /पुणे, 2. बी. व्ही. जी. इंडिया लि. चाकण, रांजणगांव एमआयडीसी, पुणे 3. युरेका फोर्ब्स लि. पुणे 4. डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टन्ट पुणे/ औरंगाबाद, 5. सुर्योदय स्मॅाल फायनान्स बँक लि.पुणे /मुंबई, ICIC Bank लातूर 7...

‘उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख पटवा, तपासणी करा आणि पुढे जा’ ; मॅथ्यू क्रॉसॉन

Image
‘उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख पटवा, तपासणी करा आणि पुढे जा’ ; मॅथ्यू क्रॉसॉन सहाव्या आयपीटेक्स आणि चौथ्या ग्राइंडेक्स पॉवर ट्रान्स मिशन प्रदर्शनाची सुरुवात अनिल चौधरी, पुणे   व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन प्रा. लि द्वारा सहाव्या आयपीटेक्स आणि चौथ्या ग्राइंडेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मॅथ्यू क्रॉसॉन अध्यक्ष अमेरिकन गिअर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन   यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन प्रा. लिचे डायरेक्टर श्री रघुनाथ जी, देताना व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिनेशन्स प्रा.लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका  श्रीमती अनिथा रघुनाथ आणि व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन प्रा. लि चे व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग श्री एस.जी वाशदेव उपस्थित होते. हे प्रदर्शन पुण्यात प्रथमच भरवण्यात आले आहे.  यापूर्वीचे पाचवे आयपीटेक्स आणि तिसरे ग्राइंडेक्स मुंबई मध्ये घेण्यात आले होते.   यावेळी बोलताना अमेरिकन गिअर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री मॅथ्यू क्रॉसॉन  (एजीएमए) म्हणाले की, “भारतात येण्याची  ही माझी पहिली...

"यूआर मोर - 7 चक्र साधना"

Image
"यूआर मोर - 7 चक्र साधना" अनिल चौधरी,पुणे चक्र योग ही नीता सिंघल यांनी २०१४साली स्थापना केली व पुढाकार घेतला आणि त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. चक्र योग कार्यशाळेमुळे जगभरातील अनेक इच्छुकांना विविध भितींवर मात करण्यासाठी, श्रद्धा मर्यादित ठेवण्यासाठी आणि सामग्री व सशक्त जीवन जगण्यास मदत झाली आहे. नीता सिंघल, आध्यात्मिक रोग-निवारक आणि नामांकित चक्र विज्ञान तज्ञ, कार्यशाळांच्या मालिकांद्वारे चक्र विज्ञानाचे खरे आणि व्यावहारिक ज्ञान आणि सखोल ज्ञान देणे हे आहे. त्यांच्या विश्वास आहे की 7 चक्र (शरीराची सूक्ष्म उर्जा केंद्रे) सक्रिय आणि संतुलित केल्यास जीवनातील समस्या निराकरण करण्यात मदत होऊ शकते. यामुळे चक्र फाउंडेशनला "चक्र योग विथ नीता सिंघल" हा एक जागतिक कार्यक्रम जाहीर करून त्यांचे पुढील मोठे पाऊल उचलण्यास प्रेरणा मिळाली. उपचार हा व स्वयं-विकास कार्यक्रम 7 चक्रांच्या कायद्यानुसार आत्मसात करण्यासाठी संतुलित साधने प्रदान करतो, मर्यादीत विश्वास आणि भीती दूर करण्यासाठी ध्यान आणि विविध तंत्र सोडतो. हा कार्यक्रम दिनांक 23 फेब्रुवारी, 2020 रोजी दुपारी ३:३0 वाजता मोरेश्वर स...

कासारवाडा येथून दहा लाखाचे  दागिने पळविले

Image
कासारवाडा येथून दहा लाखाचे  दागिने पळविले   हिंगोली - घरातील ब्याग कापून त्यातील ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा एक डबा त्यात २६७ ग्रॅम ८०० मिलिग्राम अंदाजे दहा लाख ७६ हजार २० रुपयांचे दागिने पळविल्याची घटना १० फेब्रुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली असून गुरुवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कासारवाडा येथील प्रदीप उपाध्ये हे खाजगी नोकरी करीत आहेत. त्यांनी घरात एका ब्यागेत सोन्याच्या दागिन्यांचा एक डब्बा ठेवला होता. त्यामध्ये २६७ ग्रॅम ८०० मिलिग्राम असा एकूण  दहा लाख ७६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने सोमवारी (ता.१०ते ११) रोजी रात्री सवा नऊच्या सुमारास पळविले आहे. गुरुवारी उपाध्ये यांनी पाहताच घरातून दागिने पळविल्याचे उघडकीस येताच त्यांनी शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केनेकर करीत आहेत.

शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Image
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल   हिंगोली - जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी कळमनुरी येथील गटविकास अधिकारी चर्चा करीत असताना सीईओ यांच्या दालनात येऊन तू लई हरामखोर आहेस असे म्हणून विनाकारण शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याची घटना बुधवारी साडे पाचच्या सुमारास घडली. त्यानंतर गुरुवारी हिंगोली शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी हे बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चर्चा करीत असताना तेवढ्यात भाटेगाव येथील उपसरपंच शंकर आडे हे काही काम नसताना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात येऊन बीडीओ खिल्लारी यांना  तू हरामखोर आहेस म्हणून विनाकारण शिवीगाळ केली. आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुरुवारी मनोहर खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेख सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

गाडी जाळून नुकसान केल्या प्रकरणी चार जनावर गुन्हे दाखल

Image
गाडी जाळून नुकसान केल्या प्रकरणी चार जनावर गुन्हे दाखल   हिंगोली - तू येथे काय करतोस, तू निघ म्हणून  वाचमनला मारहाण करून दुचाकी जाळून ८२ हजाराचे नुकसान केल्या प्रकरणी चार अज्ञात लोकांवर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक नगर येथील बाबा नाईक यांच्या प्लॉट मध्ये बुधवारी रात्री दहा ते अकरा च्या सुमारास अज्ञात चार लोकांनी येऊन गाडी जाळण्याचा प्रयत्न करीत असताना वाचमन मध्ये आला असता या लोकांनी यास तू येथे काय करतोसतू निघ म्हणून मारहाण केली. आणि तेथील फलकावर असलेला मजकूर पुसून टाकला, आणि गाडी पेटून ८२ हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी वाचमन सुभाष तुकाराम कांबळे यांच्या फिर्यादी वरून चार जनावर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.         Reply Reply to all Forward

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

Image
संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर  जिल्हा दौरा   लातूर,दि.13:- राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 सकाळी 9 वाजता लातूरहून उदगीरकडे  प्रयाण. सकाळी 10.30 वाजता   शासकीय विश्रामगृह उदगीर येथे राखीव. दुपारी 12.41 वाजता श्री. भास्कर रंगराव पाटील, रा. तिवटग्याळ यांच्या मुलाच्या लग्न सोहळयास उपस्थिती. स्थळ:- तिवटग्याळ, ता.उदगीर. दुपारी 1.10 वाजता श्री.बसवंतराव बिराजदार (तपसाळे) रा.तोंडार यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- माहेश्वरी मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर.  मतदार संघातील विविध  कार्यक्रमास उपस्थिती/ भेट, शासकीय विश्रामगृह, उदगीर येथे राखीव, व सोयीनुसार उदगीरहून लातूरकडे प्रयाण, लातूर येथे आगमन व मुक्काम. शनीवार दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी  9 वाजता लातूरहून उदगीरकडे प...