Posts

Showing posts from February 12, 2020

मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

Image
मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा   मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा मुंबई, दि. 11 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील शासनाच्या तयारीचा तसेच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीने आज आढावा घेतला. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी नुकत्याच गठित झालेल्या या उपसमितीची पहिली बैठक उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंगळवारी दुपारी विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असलेल्या याचिकेवर 17 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. विधी विभागाच्या तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या सुनावणीची तयारी तसेच यासंबंधी नेमलेल्य...

सर्व माल वाहतुक व्यवसायिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे

Image
सर्व माल वाहतुक व्यवसायिकांनी  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावेलातूर,  कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 अंतर्गत माल वाहतुक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/मालाची घरपोच वाहतूक करणारी कुरीअर  कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे ,वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक यांनी कॉमन कॅरीअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी  प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 अंतर्गत विना नोंदणीकृत माल वाहतूक करणाऱ्या कुरिअर कंपन्या व वैयक्त्कि  व्यवसाय करणाऱ्या कुरिअर एजन्सी विरुध्द उक्त अधिनियमाच्या कलम 18 नुसार कारवाई करण्याचे मा. उच्च न्यायालय, मुंबई  यांनी जनहित याचिका क्र. 74/2017 मध्ये दि. 31 जुलै 2019 रोजी आदेशित केले आहे. त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या कुरिअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर उजन्सी यांना अवगत करण्यात येते की, कॅरेज बाय रोड अधिनियम ,2007 अंतर्गत संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून सदर नोंदणी...

दिल्लीतील विजयाबद्दल आम आदमी पार्टीतर्फे लातूरात जल्लोश

Image
दिल्लीतील विजयाबद्दल आम आदमी पार्टीतर्फे लातूरात जल्लोश लातूर -देशाची राजधानी दिल्लीच्या सुजाण नागरिकांनी  विधानसभेच्या निवडणुकीत  मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकोपयोगी कामाची प्रत्यक्ष अनुभूती घेवून आप ला सलग तिसर्‍यांदा विक्रमी मतांनी  विजयी करु, देशाच्या नागरिकांना यापुढे आपल्या मुलभूत प्रश्‍नांवर व देशाच्या विकासाच्या मुद्यांवर मतदान करावे असा जणू संदेशच दिला . आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील केलेल्या कार्यावर जनतेने मतदानरूपी घवघवीत यश मिळवून दिले अन् आम आदमी पार्टीने सर्वाधिक जागा मिळवुन यश संपादन केले.त्याबद्दल आम आदमी पार्टी लातूर तर्फे शहरातील गांधी चौक येथून बाईक रॉली काडून शरातील विवेकंनद चौक, बसवेशवर चौक, राजीव गांधी चौक,पीव्हीआर चौक, रेणापूर नाका, शिवाजी चौक, अशी बाईक रॉली काडून  गांधी चौक येथे  सपन्न झाली तसेच पेढे वाटून व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी  आपचे शफी चौधरी,दिपक कानेकर, सुमित दिक्षीत, अश्‍वीन नलबले,शिवलिंग गुजर, बाळ होळीकर,विक्रंात शंके, हरी गोटेकर, नितीन चालक, शाहरूखा शेख, नैमोद्ीन शेख, जफर...

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत भाग्यश्री सुवर्णकार राज्यात तृतीय.

Image
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत भाग्यश्री सुवर्णकार राज्यात तृतीय .   उदगीर (संगम पटवारी)    फुले शाहू कला अकॅडमी, औसा (सारोळा) वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विद्यावर्धिनी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री बालाजी सुवर्णकार हिने सहभाग नोंदवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत घोडके व कलाशिक्षक निवृत्ती जवळे व वर्गशिक्षक सुधाकर बलीनवर यांनी हिचे अभिनंदन केले असून तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 

गांधी चौकात मोकाट जनावरांचा संचार अपघाताचे प्रमाण वाढले, पालिकेचे साफ दुर्लक्ष

Image
गांधी चौकात मोकाट जनावरांचा संचार अपघाताचे प्रमाण वाढले, पालिकेचे साफ दुर्लक्ष   हिंगोली -शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गांधी चौकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने अपघातात वाढ होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कडे मात्र पालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील जनावरे हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.   शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यावर यामध्ये गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका, बसस्थानक, जवाहर रोड रिसाला बाजार,आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा कळप ठिय्या धरून बसत आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.    यापूर्वी मागील वर्षी मोठा गाजावाजा करून पालिकेने मोकाट जनावरांना पकडून कोंड वाड्यात टाकण्यासाठी भल्या पहाटे मोहीम राबविली होती. काही जनावारांच्या पशुमालकाकडून दंड वसूल करण्यात आला होता. जेमतेम आठ दिवस चाललेली मोहीम पालिकेने गुंडाळून टाकल्याने पुन्हा मोकाट जनावरांचा मुक्त वावर शहरातील मुख्य ठिकाणी वाढल्याने नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी म...

95 ग्रामंपचातच्या प्रभाग रचना आरक्षणाचे काम पुर्ण

95 ग्रामंपचातच्या प्रभाग रचना  आरक्षणाचे काम पुर्ण हिंगोली - तालुक्‍यातील 95 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना आरक्षणा बाबत तीन टप्प्यातील कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रीया पुर्ण झाली असून त्‍याच्या याद्या संबधीत गावातील चावडीवर लावण्यात आल्या आहेत.    दरम्‍यान , या बाबत कोणाचा आक्षेप किंवा हकरत असेल तर शुक्रवारपर्यत (ता.१४) नोंदविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी केले आहे. तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जुलै ते डिसेंबर 2020 या कलावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी हिंगोली तालुक्‍यातील 95 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणा बाबत एक ते तीन टप्प्यातील कार्यक्रम जाहीर झाला आहे.    त्‍यानुसार पहिल्या टप्प्यात सदस्यांची संख्या, प्रभागाचे विभागजन करणे, जागा राखुन ठेवणे त्‍यानंतर आरक्षणासाठी सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे संबधीत तलाठी, ग्रामसेवक यांनी स्‍थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चीत करणे व अनुसुचित ...

३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार मंगळवारी बारावीची परीक्षा

३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार मंगळवारी बारावीची परीक्षा   हिंगोली - जिल्ह्यातील३३परीक्षा केंद्रावर मंगळवारी( ता.१८) फेब्रुवारी रोजी १३हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाही कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.   येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी. पावसे, मलदोडे, वडकुते, पळसकर आदींची उपस्थिती होती. इयत्ता बारावी परीक्षा १८फेब्रुवारी ते १८ मार्च  या कालावधीमध्ये तेहतीस परीक्षा केंद्रावर  होणार आहे. तर इयत्ता दहावी परीक्षा तीन ते २३ मार्च  दरम्यान होणार असून परीक्षेला दोन हजार वीस विद्यार्थी बसले आहेत.ही परीक्षा ५३केंद्रावर घेतली जाणार आहे.  बारावीसाठी तेहतीस परीक्षा केंद्र जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहेत. परीक्षा सुरळीत व कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यात पाच भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत.    प्रत्येक तालुक...