तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज
तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज हिंगोली- दिवसेंदिवस महिलांना पेटविण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत कांडाच्या घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र सून झाला असताना अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली, यात घरातील किरकोळ वादातुन पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ७८ टक्के भाजली असून, तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संगीता (२६) असे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेच नाव आहे. संगीताचे माहेर हे गुगुळ पिंपरी असून, आठ वर्षांपूर्वी शंकर यांच्या सोबत विवाह झाला होता, या दाम्पत्याना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. सुरुवातीला सुरळीत चालनाऱ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली अन मागील काही दिवसापासून किरकोळ वादावरून घरात वादंग उठत गेले हे वादंग एवढे वाढत गेले की, चक्क पत्नी घरात एकटी पाहून नवऱ्याने घरात धाव घेतली हातात रॉकेलची कॅन घेऊन पत्नीच्या अंगावर भडाभडा ओतली...