Posts

Showing posts from February 10, 2020

*उदगीर तालुका पत्रकार संघाचे १५ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण.*

Image
* उदगीर तालुका पत्रकार संघाचे १५ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण.*    राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार वितरण.     उदगीर : उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून दिले जाणारे पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे व कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.   उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून मराठवाडास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागून तज्ञ परीक्षक मंडळाचे मार्फत स्पर्धकांची निवड करण्यात येते  सन २०१८ व २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ११ वाजता संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री संजय बनसोडे, कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन, वफ्त बोर्डाचे मंत्री आमदार प्रभू चव्हाण, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे...

ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !

Image
ग्लॅमरस अंदाजातल्या सई , ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !     अनिल चौधरी, पुणे सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे, त्यांच्या ‘मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या ह्या फोटोमूळे आता ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय.  ह्या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ 5 जून 2020ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.  ह्या चित्ताकर्षक फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सई, ललित आणि पर्ण ह्यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक ह...

वीर शहीद नायक सुरेश चित्ते अभिवादनानिमित्त उद्या कीर्तन

Image
वीर शहीद नायक सुरेश चित्ते अभिवादनानिमित्त उद्या कीर्तन आलमला / प्रतिनिधी   वीर शहीद नायक सुरेश चित्ते यांना अभिवादनानिमित्त उद्या बुधवारी (दि.१२) रात्री ९ वा. आलमला येथे हभप. नेहाताई भोसले महाराज जेजुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. हनुमान मंदिरासमोर गावचावडीत हे कीर्तन होणार असून यावेळी वीरमाता व वीरपत्नीचा सन्मान ग्रामस्थ व संयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कीर्तनात सर्वश्री हभप. सुरेश माळी हरंगुळ, गणेश सुतार लातूर, संजय लखशेटे गंगापूर व दत्ता निकम गंगापूर यांचे गायन, हभप शिवराम गुरूजी एकुर्गेकर यांचे हार्मोनियम तर हभप मृदंगभूषण ईश्वर गुरूजी किल्लारीकर यांचे मृदंगवादन तर हभप मोहन पाटील पेठसांगवीकर यांचे तबलासाथ राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष सचिन कापसे, भजनी मंडळ व आलमला ग्रामस्थांनी केले आहे.

शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वतयारी

शिवजयंती महोत्सवा निमित्त पूर्वतयारी करण्यासाठी महिलांची आढावा बैठक  महिला समिती ठिकठिकाणी महिलांच्या बैठका घेणार   हिंगोली -   शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वतयारी नियोजन व आढावा बैठक येथील एनटीसी परिसरातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान येथे पार पडली . या शिवजयंती उत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी महिला समितीकडून प्रभाग नुसार बैठका घेणार असल्याचे ठरले.   या बैठकीत शिवजयंती महोत्सवात विविध स्पर्धा, दिपोत्सव, भव्य मिरवणूक व इतर कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी चर्चा करूण शहरातील विविध प्रभागात व परिसरात शिवजयंती महोत्सवातील कार्यक्रमाची माहिती देण्या करीता महिलांच्या बैठका गुरूवार दि.१३ फेब्रुवारी पासून महिला समितीच्या पुढाकाराने घेण्याचे ठरले आहे. सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी हिंगोली येथे महिला समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरूवातीला हिंगणघाट येथील झालेल्या विकृतीची एक निष्पाप लेक बळी ठरली. त्या लेकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.     यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव...

कृषी प्रदर्शनात शेतक-यांची गर्दी, कृषी संजीवनी महोत्सवः 200 स्टॉल्सची उभारणी, अश्‍व प्रदर्शन लक्षवेधी

Image
परभणी, प्रतिनिधी (कै.) अ‍ॅड.शेषराव भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवात उभारण्यात आलेल्या कृषी विषयक व विविध वस्तुंच्या स्टॉल्स भेटी देण्यासाठी शेतक-यांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी(दि.सात) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महोत्सवाचे आयोजन भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केले आहे. 7 ते 11  फेब्रुवारी दरम्यान आयोजित या कृषी प्रदर्शनात 10 फेब्रुवारी रोजी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनात सुमारे 200 स्टॉल्स उभारण्यात आले आहे. यामध्ये बी-बियाणे, किटकनाशक, रोपविटिका, टॅ्रक्टर, मशागतीचे यंत्र, ठिबक सिंचन, गृहपयोगी वस्तु, सौरउर्जेवरील वस्तु, शासकीय योजनांची माहिती देणारे जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आदीसह महिला बचतगटाच्या स्टॉल्सचा समावेश आहे. शेती उपयोगी स्टॉल्स मध...

किराणा दुकानात १५ हजाराची अवैध देशीदारु पकडली

किराणा दुकानात १५ हजाराची अवैध देशीदारु पकडली   वसमत - तालुक्‍यातील कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सेलू येथे एका किराणा दुकानातून १४हजार ९७६  अवैध देशीदारुच्या २८८ बॉटल जप्त  करून रविवारी (ता.९) गुन्हा दाखल झाला आहे.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सेलू येथे संदीप गंलाडे यांच्या किराणा दुकानात सहा बॉक्‍स मध्ये १४हजार९७६ रुपये किमंतीच्या २८८ बॉटल चोरटी विक्री करण्यासाठी त्‍याच्या ताब्यात बाळगुण असताना आढळून आला. त्‍याला गोविंद भोसले राहणार आंबाचोंडी हा देशीदारुचा माल पुरवठा करत असल्याचे  संदीप गलांडे यांनी सांगितले. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गोपीनवाड यांच्या फिर्यादीवरून संदीप गलांडे व त्‍याला दारुच्या बॉटल विक्री करणारा गोविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कुरुंदा पोलिस करीत आहेत.

देवस्‍थानची जमीन ग्रामपंचायतच्या नावे करा

Image
    देवस्‍थानची जमीन ग्रामपंचायतच्या नावे करा   कळमनुरी - तालुक्‍यातील पिंपरी येथील तीन हेक्‍टर ८१ आर जमीन भोगवाटदाराचे नाव महादेव देवस्‍थानची आहे. परंतू ती जमीन गावातील दोघेजण वाहिती करीत आहेत. या बाबत चौकशी करून सदर जमीन ट्रस्‍टच्या नावे किंवा ग्रामपंचायच्या नावे करावी अशी मागणी करण्यात आली आहे.    या बाबत सरपंच अरुणा जाधव यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमुद आहे की. पिंपरी येथील सर्वेनंबर 157 मधीत 3 हेक्‍टर 81 हाजर जमीन  भोगवाटदाराचे नाव महादेव देवस्‍थानची आहे. परंतू ती जमीन गावातील संदीप पुंड व गजानन पुंड दोघेजण जमीनीची वाहिती करतात पंरतू हे दोघे जमीनीचे उत्‍पन्न स्‍वतःच्या कुटुंबावर खर्च करतात. मात्र देवाच्या मंदिरावर कोणाताही खर्च करीत नाहीत व गावातील ग्रामस्‍थ मंदिरावर खर्च करा असे म्‍हणाले असता वाद घालतात. या प्रकरणाची चौकशी करून सदर जमीन ट्रस्‍टच्या नावे किंवा ग्रामपंचायच्या नावे करावी त्‍यामुळे कोणताचा वाद होणार नाही अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच अरुणा जाधव, यांच्यासह ग्रामस्‍थांनी केली आहे.         Reply...

वसमत येथे 8,43,468 रुपयाचा गुटखा आढळला

Image
        वसमत येथे 8,43,468 रुपयाचा गुटखा आढळला परभणी येथील औषध प्रशासनाने तपासणी करून गोडाऊन केले सील     वसमत - येथे परभणी येथील अन्न व औषध प्रशासनातर्फें सोमवारी (ता.10) प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या अनुषंगे तपासण्या केला असता शहरात दोन ठिकाणी 8 लाख 43 हजार 468 रुपयाचा गुटखा जप्त करून गोडाऊनला सील करण्यात आले आहे.    या बाबत माहिती अशी की, परभणी येथील अन्न व औंषध प्राशसनातर्फे सोमवारी वसमत येथील भेट देवून मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेले कॉम्प्लेक्स मधील खालिद शेख यांच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला  8 लाख 35 हजार 328 रुपयाचा अन्नपदार्थ आढळून आला असून हे गोडाऊन सील करण्यात आले आहे. सदर गोडाऊन मुझाहेद खान नसीब खान पठाण यांना भाड्याने दिले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या गोडाऊन मध्ये सुद्धा प्रतिबंधित गुटखा व पानमसला आढळून आला. आयुक्तांच्या आदेशान्वये सदर गोडाऊनला सील करण्यात आले.    दुसऱ्या कारवाईत भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केली असता घराच्या बोळीत मध्ये 8140 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ...

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी साईजन्मभूमी पाथरी येथे घेतली आढावा बैठक . 

Image
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी साईजन्मभूमी पाथरी येथे घेतली आढावा बैठक .   प्रतिनिधी पाथरी:- जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी उद्या मुबंई येथे मंत्रालयात होत असलेल्या साईजन्मभूमी पाथरी विकास आराखडा बैठकी संदर्भात, साई मंदिर पाथरी येथे १० फेब्रुवारी सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली.  यावेळी जिल्हाधिकारी यांचे जन्मस्थान मंदिर सामितीचे अध्यक्ष सिताराम धानु यांनी स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष नितेश भोरे, नगरसेवक अलोक चौधरी, नासिरुद्दीन सिद्धीकी, अनिल पाटील, अरुण दैठणकर. अॅड अतुल चौधरी,उपविभागीय अधिकारी व्हि एल कोळी,गटविकास अधिकारी बायस मुख्याधिकारी, तहसिलदार यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मारोती मंदिरा मागील जागेची आणि मंदिर परिसराची जिल्हाअधिकारी पी शिवा शंकर यांनी पहाणी केली.