महाआवास योजनेत राज्यात प्रथम येण्यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
जिल्हा परिषदेत महाआवास अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा
हिंगोली,- महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्देशाची कामगिरी कौतुकास्पद असून राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आयोजित कार्यशाळेत अधिकाऱ्यांना गुगल मिटद्वारे ऑनलाईन सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी सकाळी ११.०० वा करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, आत्माराम बोन्द्रे, डॉ.मिलिंद पोहरे,व्ही.पी. राठोड, उमेश स्वामी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यकार्यकारी अधिकारीराधाबीनोद शर्मा म्हणाले २०२२ पर्यंत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्व पूर्ण असुन तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे अशा सुचना त्यांनी संबंधीतांना दिल्या . तर प्रकल्प संचालक धनवंत माळी यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान - ग्रामीण जिल्हा तालुका व ग्राम स्तरावर राबवायचे आहे . त्या अनुषंगाने ग्रह निर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी विविध तीस क्रम राबवुन ग्रामीण घरकुलात गुणवता आणणे तसेच शासनच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश असून त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.