हिंगोली - लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

 लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी 


हिंगोली -    ऑनलाइन फेरफार करण्यासाठी एका शेतकर्यांकडून पाच हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यास मंगळवारी (ता.२२) रोजी  न्यायालयासमोर उभे केले असता लाचखोर तलाठयास चौदा दिवसांची न्यायालय कोठडी देण्यात आली असून त्यास परभणी कारागृहात रवानगी केली आहे.

कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील तलाठी बेले  यांनी तक्रार दाराच्या शेताचे ऑनलाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करून देतो म्हणून पाच हजाराच्या लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती.तसेच तहसील कार्यालयातील ऑनलाईनची कामे करणारे कोतवाल हमीद यांच्याकडे रकम देण्याचे सांगितले होते.त्यानुसार तक्रारदाराने १६ डिसेंबर रोजी तलाठी बेले यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत कार्यालयात केली. त्यानुसार  
लाचलुचपत विभागाचे प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकरणी पडताळणी केली असता यात कोतवाल हमीद याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले.यावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला होता.यावरून त्या लाचखोर बेले तलाठी व कोतवाल हमीद यांना मंगळवारी न्यायालयात उभे केले असता त्या लाचखोरास१४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले.सदर प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा