वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ? ही निवडणूक बुध्दिवाद्यानची....
वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ?
ही निवडणूक बुध्दिवाद्यानची....
विलास जोशी
-----------------
हिंगोली - औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी( ता.१) होत असल्याने या निवडणुकीत वंचित व भाजप बंडखोर उमेदवाराची मते निर्णायक ठरणार असून कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी कळणार आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत्तीची श्यक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण ,भाजप मित्र पक्षाचे शिरीष बोराळकर ,वंचित आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ तर भाजपचे निष्ठावंत असलेले रमेश पोखळे यांना डावलल्याने ते देखील बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात आपले भवितव्य अजमावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.तसेच महाविकास आघाडीतून बंडखोरी करीत दिलीप घुगे देखील निवडणूक लढवीत आहेत.तर विध्यार्थी प्रिय, अनेक आय ए एस अधिकारी कलासेसच्या माध्यमातुन बनवलेले सचिन ढोबळे सर यामुळे तुल्यबळ लढतीत सतीश चव्हाण ह्याट्रिक करणार की, त्यांचा विजयाचा रथ रोखण्यात शिरीष बोराळकर यांना यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप यांच्यात तुल्यबळ लढत झाल्याने भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करीत सतीश चव्हाण विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने ही होणारी निवडणूक काट्याची होण्याची शक्यता राजकीय विश्लेषका कडून वर्तवली जात आहे. कारण या निवडणुकीत वंचित आघाडीने देखील तगडा उमेदवार नागोराव पांचाळ यांच्या रूपाने उतरविला असल्याने ते देखील या दोघांना नाकेनऊ आंतील तर भाजपचे बंडखोर रमेश पोकळे, अपक्ष दिलीप घुगे ,प्रहार जनशक्ती चे सचिन ढोबळे हे की विजया समीप जातात यांनी किती मताधिक्य घेतात यावर बेरीज ,वजाबाकीचे गणित अवलंबून आहे.
दरम्यान, प्रचारात आघाडीचे व भाजपच्या सभानी रान उठविले होते. दोघांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात बैठका, मेळावे झाले, जोतो आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करीत होते. सभेतून, बैठकातून एकमेकांच्या उमेदवारांवर चिखलफेक केली जात होती.त्यामुळे आपल्या आपल्या उमेदवारासाठी नेत्यांनी जीवाचे रान करून प्रचार यंत्रणा राबविली. आजची रात्र काळोख्याची असल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी शेवटी लक्ष्मी अस्त्राचा वापर ही केला जाऊ शकतो.त्यामुळे या बाबीकडे निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. मात्र या निवडणुकीत वंचित ,अपक्ष, बंडखोरी यांची मते निर्णायक ठरणार असून ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी कळणार असून, याकडे सर्व राजकीय नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.