स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदासाठी अनेक जणांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदासाठी अनेक जणांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
हिंगोली - येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर रुजू होण्यासाठी अनेक पोलीस निरीक्षक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.
येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे येथे दबंग कामगिरी बजावली आहे. तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक थोरात यांची मागील दोन वर्षांपूर्वी बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी जगदीश भंडरवार यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार घेतल्यानंतर अनेक धाडसी कारवाया भंडारवार यांनी केल्याने वाळू माफिया असो की ,अवेध्य धंदे वाले कोमात गेले होते. मात्र भंडरवार यांनी मागील सहा ते सात वर्षाच्या काळात त्यांनी हिंगोली पोलीस दलात चमकदार कामगिरी बजावली आहे.
दोन दिवसांपूर्वी नांदेड पोलीस क्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार
तांबोळी यांनी परिक्षेत्रातील पंधरा पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त झाल्याने हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पाच ते सहा पोलीस निरीक्षकानी गुडघ्याला बासिंग बांधून बसले आहेत. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.