जामठी येथे विधवा महिलेचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

जामठी येथे विधवा महिलेचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल


मानवहित लोकशाही कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे आरोपीना अटक


सेनगाव  -( बबन सुतार )  तालुक्यातील जामठी येथील अनुसूचित जातीतील समाजाची विधवा महिला आपल्या मुलाबाळांसह घरात झोपली असताना गावातील उच्चवर्णीय जातीतील एकाने तिच्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून तिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केले असल्याने त्या दोषींविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे.


 तालुक्यातील गोरेगाव ठाणे हद्दीत येत असलेल्या जामठी येथील अनुसूचित जाती समाजातील ४० वर्षीय विधवा महिला आपल्या दोन मुलाबाळांसह घरात झोपलेली असताना गावातील आरोपी यादव पांडुरंग शिंदे यांनी  वसरी कडील दरवाजाची कडी खोलून अनधिकृतरित्या घरात प्रवेश केला आपल्या घरात कुणीतरी आले असल्याचा आवाज पीडित महिलेच्या कानी पडतात ती झोपेतून जागे होऊन दरवाजा जवळ आली असता तिला गावातील उच्चवर्णीय मराठा जातीतील यादव पांडुरंग शिंदे हा आला असल्याचे दिसून आल्याने पीडित महिलेने आरडाओरड केली असता आरोपी यादव शिंदे यांनी तू आरडाओरड करू नकोस व माणसे जागी करू नकोस असे म्हणून पीडित महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून येथून पळ काढला, तेव्हा पीडित महिलेचे मूलबाळ जागी झाले व तसेच ओरडण्याचा आवाज केल्याने पीडित यांचे शेजारी व देर जागी झाले संबंधित नातेवाईकांना पीडीते सोबत घडलेला गैरप्रकार सांगितला, आरोपी यादव पांडुरंग शिंदे यास पीडितेचे जात ही अनुसूचित जातीतील आहे असे माहित असून सुद्धा आरोपीने पीडित महिलेच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला असल्याचा प्रकार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या अंदाजे ११ वाजून ३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.


 संबंधित पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी यादव पांडुरंग शिंदे जात मराठा राहणार जामठी यांच्याविरुद्ध कलम 354, 452 ३(२)(५) अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत  गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित महिले बरोबर घडलेला गैरप्रकार हा मानव हित्त लोकशाही पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मंगेश खिल्लारे यांनी आपल्या समाजातील महिलेवर होत असलेल्या अन्यायाची तात्काळ दखल घेत त्यांनी सदर घटनेची माहिती मानव हित लोकशाही पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भागवत डोंगरे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव मानमोठे, किशोर मानमोठे यांना दूरध्वनीवरून सांगितले. लागलीच समाजसेवकांनी पीडित महिलेला सोबत घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी गोरेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली. मानव हित लोकशाही पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दखलपात्र भूमिकेमुळे गोरेगाव पोलीस प्रशासनांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.


 यावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान रणबावळे ,युवा नेते सत्यपाल हनवते, यासह  समाजबांधवांनी पीडित महिलेला न्याय देण्याचा चंग बांधून यापुढे समाजावर होणारे अन्याय अत्याचार खपून घेतले जाणार नाहीत असा आक्रमक पवित्रा मानव हित लोकशाही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  घेतला असल्याचे सांगितल्या जात आहे. घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, पोलीस कर्मचारी राहुल गोटरे ,शिंदे व गोरेगाव पोलिसांनी भेट दिली आहे. घटनेतील आरोपी यादव पांडुरंग शिंदे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा