हिंगोलीत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती
हिंगोलीत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती
हिंगोली - राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील १०६१ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने मंगळवारी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठते नुसार पोलीस उपनिरीक्षक २५ टक्के कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पोलीस अंमलदार म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात नऊ पोलीस अमलदारांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये मुंजाजी गणपतराव वाघमारे, अशोक नामदेवराव कांबळे, विठ्ठल लालू जाधव,प्रकाश गणपतराव आवडे, मोहमद अरिफोद्दीन मोहमद ताजोद्दीन काजी, गंगाराम कचरू बनसोडे, फाक्रोद्दीन सिद्दीकी, उमर शेख, सुभाष आढाव, यांचा पदोन्नती मिळाल्यात समावेश आहे. पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्याना १५ दिवसाचा इंडक्शन कोर्स महाराष्ट्र पोलीस अकडेमी नाशिक येथे आयोजित केला आहे. बासंबा पोलीस ठाण्यातील बनसोडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पोनी मलपिल्लू यांनी सत्कार केला.