विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून औंढा परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून औंढा परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
औंढा नागनाथ - हिंगोली जिल्ह्यांसह औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस पिकासह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर औंढा तालुक्यातील पिकांची शनिवारी सायंकाळी पाहणी करून हिंगोलीकडे परतले.
प्रवीण दरेकर यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळुंके येथे सोयाबीन व कापूस पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत आमदार तान्हाजी मुटकुळे ,माजी आमदार गजाननराव घुगे ,भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव, किसान मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम नागरे, नारायण सोळंके, नगराध्यक्ष बाबाराव बांगर उद्धव नागरे, डॉ.दिलीप सांगळे, सखाराम इंगळे, सर्जेराव दिंडे ,प्रा गजानन कुटे, आदी भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी कृषी अधिकारी यांना धारेवर धरले.