धनवान रणबावळे यांचे निट परीक्षेत घवघवीत यश, बहुजन टायगर क्रांती सेनेच्या वतीने सत्कार
धनवान रणबावळे यांचे निट परीक्षेत घवघवीत यश
बहुजन टायगर क्रांती सेनेच्या वतीने सत्कार
सेनगाव - सेनगाव येथील डॉ .माधव रणबावळे यांचे चिरंजीव धनवान रणबावळे यांनी मागील झालेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत ७२० पैकी ५१५ गुण मिळवीत घवघवीत यश संपादित केल्याने बहुजन टायगर क्रांती सेना या सामाजिक संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
नुकत्यात राज्यात नीट वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत सेनगाव येथील मातंग समाजातील विद्यार्थी धनवान माधवराव रणबावळे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत ७२० मार्क पैकी ५१५ गुण घेत त्यांनी यशाचे शिखर गाठले असून भावी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न सुकर केले आहे.
या तरुणाने नीट वैद्यकीय परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे बहुजन टायगर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे , तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्काराचे आयोजन करून त्यांचा निवासस्थानी जंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सुतारे, जिल्हा उपाध्यक्ष संदेश शिखरे, युवा जिल्हाध्यक्ष चेतन पाटोळे ,युवा जिल्हा सचिव विकास गायकवाड, विद्यार्थी, वडील डॉ. माधव रणबावळे, आई संगीताबाई रणबावळे ,आजी सुभद्राबाई रणबावळे, पत्रकार बबन सुतार, युवा समाजसेवक ओमेश कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पाडला.यावेळी धनवान रणबावळे यांना पुढील भावी कार्य काळासाठी बहुजन टायगर क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला.
गोर गरीबाची रुग्णसेवा हेच ध्येय - धनवान रणबावळे
सेनगाव येथील रहिवासी असलेले धनवान रणबावळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत ७२० पैकी ५१५ गुण संपादित करून भावी जीवनात सर्जन होण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. अंगामी भावी काळात गोरगरिबांची रुग्णसेवा हेच माझे ध्येय असल्याचे मत धनवान रणबावळे यांनी व्यक्त केले. आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सर्जन होण्याचा माझा मानस असून मी गोरगरीब, कष्टकरी व मजूर वर्गाचे आरोग्यासंबंधी विशेष काळजी घेणार असून त्यांना माझ्या भावी आरोग्य शिक्षण यांचा फायदा मी नक्कीच वंचित घटकांना देणार असल्याची माहिती नीट वैद्यकीय परीक्षेत यश संपादित केलेले तरुण धनवान रणबावळे यांनी बोलताना सांगितले.