पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी जाहीर
पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी जाहीर
हिंगोली - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली असून ,सर्व कार्यालयात लावण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक २०२० निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची प्रारूप मतदार यादी व सूचना पत्र जिल्हाधिकारी कार्यालय सह ,जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच पोर्टलवर (ता.६)ऑक्टोम्बर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सदर यादी बाबत काही हरकती व सूचना असतील तर तशा सूचना व हरकती यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनसात दिवसाच्या आत म्हणजेच( ता.१३ ) ऑक्टोम्बर अखेर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे हरकती दाखल करण्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रनवीरकर यांनी सांगितले आहे.