उमेद कर्मचारी महिलांचा  जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उमेद कर्मचारी महिलांचा  जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा


जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन



हिंगोली - बाह्यसंस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नका ,ज्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबली आहे अश्याना पुनर नियुक्ती दयावी अशा विविध मागण्यासाठी सोमवारी उमेद महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर शांततेत मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे.


जिल्हा प्रशासनाकडे रेणुका कानडे, जया सरकटे, मेघा शेगुकर, गंगासागर पारडकर ,सारिका लोंढे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन संस्थेनुसारच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे कायम करावी, बाह्यसंस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नये, ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवास पदावरून हटविण्यात यावे, उमेद अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यक समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघांना दिला जाणारा खेळता भांडवल निधी, समुदाय निधी, जोखीम प्रवनता निधीत दुप्पट वाढ करावी, ग्रामस्तरावरील प्रेरिका यांचे रखडलेले सहा महिन्याचे मानधन तातडीने अदा करावे, प्रेरिकांचे मासिक मानधनात वाढ करून दहा हजार करावे, या विविध मागण्यासाठी उमेद महिला कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढण्यात आला. या मागण्याची शासनाने दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. हा मूक मोर्चा कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व नियमांचे पालन करीत करण्यात आला आहे.


राज्यभरात अभियानाचे काम थंडावले आहे, याचा परिणाम महिलांना व त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे १०सप्टेंबर रोजी काढलेल्या शासनाच्या परिपत्रकाचा निषेध देखील उमेद अभियानांतर्गत जोडलेल्या महिलांनी केला आहे. यावेळी कमी महिला आल्या आहेत असे सांगून येणाऱ्या काळात हजारो महिलांना सोबत घेत मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मुकमोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा