झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल” संकल्प अभियानात  सामान्य प्रशासन विभाग अव्वल

झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल” संकल्प अभियानात 
सामान्य प्रशासन विभाग अव्वल


हिंगोली -  जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या झिरो पेंडंसि अँड डेली डिस्पोजल या अभियानात सामान्य प्रशासन विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.


जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग, त्यांचे अतंर्गत कार्यालय, सर्व पंचायत समिती, मध्ये जनतेची व प्रशासकीय कामे विशिष्ट कालमर्यादेत निर्गत करण्याची कार्यालयीन कार्यपध्दती ‘झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल”  चा कार्यक्रम अखंड चालू ठेवण्यासाठी महात्मा गांधी जयंती निमित्त( ता.२) ऑक्टोम्बर पासून संकल्प अभियान
राबविन्या बाबत सर्व कार्यालय, सर्व पंचायत समिती, विविध कार्यालयाचे उप विभाग, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी हिरिरिने सहभाग नोंदवून हे अभियान पूर्णत्वास नेण्याबाबत सीईओ आर. बी. शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प अभियान सुरु केले.


त्यामुळे या संकल्प अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिरिरिने भाग घेतला घेतला होता. मागील १५ दिवसांपासून कार्यालयीन दिवशी व सुटीच्या दिवशी देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये या बाबत जयत तयारी चालू होती. 
या संकल्प अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी हिरिरिने भाग घेतला असून अनेक विभागात या बाबत जयत तयारी चालू होती. विभागातील सर्व कर्मचारी त्यांचाच विभाग प्रथम यावा या दृष्टीने कामकाज करीत होते. ज्यात अभिलेख्यांचे वर्गीकरण, कार्यालयीन स्वच्छता, संचिकांची निटनिटकी बांधणी करण्यात आली आहे. त्यातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत काम पूर्णत्वास आले आहे. 
सोमवारी रोजी संकल्प अभियानाचे परिक्षण करण्यासाठी अतिरिक्त सीईओ श्री. अनुप शेंगूलवार,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, पाणी व स्वछता विभागाचे डेप्युटी सीईओ श्री. ए. एल. बोन्द्रे , यांच्या त्रीस्तरीय समितीने तपासणी सूचीनुसार पाहणी केली.
पाहणी नंतर त्रीस्तरीय समितीने खालील प्रमाणे  गुणांकन केले आहे. 
प्रथम क्रमांक  -  सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली
व्दितीय क्रमांक  (विभागून) पंचायत विभाग व महिला व बाल कल्याण विभाग तृतीय क्रमांक  (विभागून) लघू सिंचन विभाग,  बांधकाम विभाग,  समाजकल्याण विभाग


 या संकल्प अभियानात गुणांकनाने क्रमांक मिळविलेल्या विभागांना शुक्रवारी (ता.२३)रोजी समन्वय समितीच्या बैठकीत ट्रॉफी व अधिकारी  कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. अशा प्रकारचे अभियान दरवर्षी राबवावे अशी चर्चा अधिकारी, कर्मचाऱ्यांत होत असून संकल्प अभियान राबविल्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांत उत्साह निर्माण झाला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा