जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड
जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड
हिंगोली - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नागेश पुजारी यांची फेरनिवड करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद पदवीधर राज्य संघटनेचे अध्यक्ष अतुल मुळे , विष्णू घुगे, पी.एन. गोरले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हास्तरीय नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी मध्ये सुदाम चव्हाण उपाध्यक्ष, शेख युसूफ गफार सचिव, शेख अनिस सह सचिव,दिलीप नागरे कोषाध्यक्ष ,अशोक वाघमारे जिल्हा संघटक,तर महिला संघटक म्हणून श्रीमती एस. एस.घेणेकर, श्रीमती ए. बी. शिंदे ,संपर्क प्रमुख भागवत भिसडे, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नागनाथ भोजे यांचा जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. आता तालुकास्तरावर देखील लवकरच नूतन कार्यकारिणी केली जाणार असल्याचे नागेश पुजारी यांनी सांगितले.