शनिवारी नव्याने ६९ रुग्ण पॉझिटिव्ह तर २८ रुग्णांना सुट्टी
शनिवारी नव्याने ६९ रुग्ण पॉझिटिव्ह तर २८ रुग्णांना सुट्टी
हिंगोली - जिल्ह्यात शनिवारी नव्याने ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील ५६ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर १३ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी ( ता.१९) प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तपासणीत ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसरात ४७ रुग्ण सापडले आहेत, यामध्ये बावन खोली, जिजामाता नगर, तोफखाना, भोईपुरा, जवळा बाजार,अंतुले नगर, बळसोंड आदींचा समावेश आहे. तर
वसमत परिसर एक, कळमनुरी परिसर आठ असे एकूण ५६ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १३ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील ५, वसमत परिसर एक, कळमनुरी परिसर सात, अशा एकूण१७ रुग्णांचा समावेश आहे.
तर आज तब्बल २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील १६ ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, कोरोना केअर सेंटर वसमत आठ, पाच,कोरोना केअर सेंटर औंढा येथील दोन , असे एकूण २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या सहा रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण २५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण २३३० रुग्ण झाले असून, त्यापैकी १९४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे. तर आज औंढा तालुक्यातील तुळजापूरवाडी येथील वृद्धाचा आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झाला आहे. सदरील रुग्णाचा स्वाब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.