महसूल कर्मचारी संघटनेचे आज सामूहिक रजा आंदोलन

महसूल कर्मचारी संघटनेचे आज सामूहिक रजा आंदोलन



हिंगोली -  मंडळ अधिकारी संवर्गातून अव्वल कारकून यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती दयावी या प्रमुख मागणीसाठी  महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.


शासनाच्या महसूल विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र प्रस्ताव सादर करून आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप पर्यन्त मान्यता न मिळाल्याने महसूल कर्मचाऱ्यात नाराजी पसरली आहे.तसेच प्रस्तावित केलेल्या यादीतील अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाले असल्याने त्यांना पदोन्नतीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.


राज्यातील इतर विभागातील पदोन्नतीच्या प्रक्रिया  यापूर्वीच झाल्या आहेत, केवळ मराठवाडा विभागातीलकर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.यापूर्वी अनेक वेळा संघटनेने   मंत्रालयात धाव घेऊन  महसूल मंत्री, राज्यमंत्री यांची भेट घेऊन प्रस्तावास मान्यता देण्याबाबत वारंवार चर्चा झाली.परंतू मराठवाडा विभागातील महसूल कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय होत असल्याने अखेर मागण्या मान्य होत नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारी सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसल्याने गुरुवारी कामकाज ठप्प राहणार आहे.जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी या सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार आहेत. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने राज्य शासनाला दिला आहे. निवेदनावर  अध्यक्ष इमरान पठाण, कुसुम भिसे, दिलीप कदम ,गोपाल कंठे, एम. जे. शर्मा, एस.एन. पाटील, रामप्रसाद चव्हाण, महेश कुमार हिवरे, ए. क्यु, शेख, ए. व्ही. पवार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा