धक्कादायक ; हिंगोलीत दोघाचा मृत्यु नव्याने ९० पॉझिटिव्ह
धक्कादायक ; हिंगोलीत दोघाचा मृत्यु नव्याने ९० पॉझिटिव्ह
हिंगोली - जिल्हातील हिंगोली शहरातील खटकाळी भागातील ७५ वर्षीय पुरुष व वसमत उपजिल्हा रूग्णालयातील ८५ वर्षीय पुरुषांचा कोरोनामुळे शुक्रवारी (ता. ११ ) मृत्यु झाला तर नव्याने ९० रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी दिली.
त्यापैकी १५ रुग्ण रँपीड अँन्टीजन टेस्टद्वारे आढळून आले. तर ७५ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळले आहेत. तर ३८ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १९९० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १५६० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ४०६ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि २४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.