मराठा शिवसैनिक सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा मराठा आरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करा
मराठा शिवसैनिक सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा
मराठा आरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करा
सेनगाव - येथे सोमवारी मराठा शिवसैनिक सेनेतर्फे मराठा आरक्षण व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसगट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, त्याच बरोबर मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आज मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यात बैलगाड्या घेऊन मराठा शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले. यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.