आसना नदीला महापूर ; कुरुंदा गावाला पाण्याचा वेढा

आसना नदीला महापूर ; कुरुंदा गावाला पाण्याचा वेढा



चोहीकडे पाणीच पाणी,अनेकांच्या घरात शिरले पाणी


 नामदेव दळवी
------------------
 कुरुंदा - वसमत तालुक्यातील
कुरुंदा येथे गुरुवारी रात्री तीन वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे  शुक्रवारी सकाळी आसना नदीला महापूर आल्याने गावाला पाण्याचा वेढा दिल्याने ,चोहीकडे पाणीच पाणी झाले असून अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.


दारम्यान ,वसमत परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली, यामध्ये गावाजवळ असलेल्या आसना नदीला महापूर आल्याने नदी पात्रात पाणी अधिक झाले ,त्या दाबामुळे बँक वॉटर मुळे नदी काठाच्या शेत जमीनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर कुरुंदवाडी- सेलू पांदण रस्त्याच्या कडून येणाऱ्या नदीपात्रात पुराचे पाणी क्षमतेपेक्षा अधिक झाले, बँकवॉटर मुळे शिरल्याने 
काही शेतकऱ्यांच्या पिकांमधून नदीचे पात्र तयार झाल्या सारखे पुराचे पाणी वाहत होते ,तसेच सुकळी कडून  येणाऱ्या नदीपात्रात सुद्धा महापूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातून पुराचे पाट वाहत होते .


कुरुंदा येथे पुराच्या पाण्याने  संपूर्ण गावाला चारी बाजूंनी वेढा घातला होता. या पावसाच्या महापुरामुळे कुरुंदा, सुकळी, कुरुंदवाडी, डोनवाडा गावातील नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच कुरुंदा गावातील गणेश नगर ,आरामिशन, साईबाबा नगर ,साठे नगर , श्रावस्ती नगर, लवजी नगर, संत तुकाराम महाराज मंदिर आदि गल्लीतील घरात पाणी शिरल्याने अनेकांना धान्य, कपडे,संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने पानी वाहत होते.त्याच बरोबर दुर्गा माता मंदिरला पुरच्यां पाण्याने वेढा घातला होता.२०१६ च्या ढगफुटी नंतर पुन्हा महापूरचा फटका कुरुंदावासीयांना बसला आहे.


२०१६ ला  झालेल्या ढगफुटीची पुन्हा एकदा या झालेल्या महापुराने ताजी आठवण  कुरुंदा येथील ग्रामस्थांना करून दिली आहे.  मात्र प्रशासन याबाबतीत निष्काळजी करताना दिसून येत आहे . कुरुंदा येथील ग्रामस्थांनी मागील अनेक वेळा प्रशासनाला कुरुंदा येथील नदी पात्र रुंद करण्यात यावे व गावा भवताली कट्टा भिंत उंच करण्यात यावी यासाठी कागदोपत्री पाठपुरावा करून मागणी केली होती. परंतु याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे .आता तरी संबंधित विभागाने कुरुंदा गावाच्या पूर परिस्थितीचा विचार करून कुरुंदा गावापासून पुढे किन्होळा नदी पात्र पर्यंत रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच या पावसामुळे झालेल्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाने तातडीने करण्याची गरज नुकसान झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.


याबाबत वसमत उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ,पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तलाठी ,मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठविले असून सविस्तर माहिती घेतली जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा