एक लाखाचा धनादेश असताना, केले दोन लाखाचे वितरण बँक ऑफ महाराष्ट्रचा भोंगळा कारभार
एक लाखाचा धनादेश असताना, केले दोन लाखाचे वितरण
बँक ऑफ महाराष्ट्रचा भोंगळा कारभार
कळमनुरी - येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत एका व्यापाऱ्याने एक लाखाचा धनादेश दिला असता कॅशियरने त्याला दोन लाख रुपये दिले असल्याची खळबळजनक बाब कळमनुरी येथे घडली, व्यापाऱ्याच्या स्वभावात असलेल्या ईमानदारी मुळे एक लाख रुपये रक्कम बँकेला परत मिळाली बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी व निष्काळजीमुळे बँकेच्या व्यवहारावर प्रश्न निर्माण होत आहेत.
येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा सुरुवातीपासून हिटलर वर्तणुकीची असून ग्राहकांना आपली गरज आहे. आपल्याला ग्राहकांची कधीच गरज भासणार नाही अशी कल्पना येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या वागणुकीत होत आहे ,गर्वाचे घर खाली असते या म्हणीचा खुलासा मात्र १८ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दिसून आला गर्वाने व्यासलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना माणुसकीच्या खऱ्या जगाचे दर्शन झाले.
शहरातील व्यापाऱ्यांनी आर्थिक अडचणीत सहकार्य मिळावे या उद्देशाने शिव कृपा पुरुष बचत गट निर्माण केले ,हे गट दोन वर्षांपूर्वी शहरातील विश्वासू व प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी नगरसेवक संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्थापित झाले होते. व्यापाऱ्यांच्या गरजेनुसार सर्वांच्या सहमतीने गटातील सदस्यांना रक्कम दिली जाते. या अनुषंगाने १८ सप्टेंबर रोजी गटातील सदस्य व व्यापारी गजानन पुंडकर यांना गटाने एक लाख रुपयाचा धनादेश दिला संबंधित व्यापारी ने धनादेश १८ सप्टेंबरला चार वाजण्याच्या सुमारास बँकेत दिला असता बँक कॅशियरने त्यांना पाचशे रु. चे १०० नोटा असलेले चार बंडल दिले बँकेचे व्यवहार कडीचोख असतात या विश्वासाने रक्कम घेऊन पुंडकर बँकेतून निघून गेले. परंतु त्यांच्या लक्षात आले की आपल्याला बँकेने दोन लाख रुपये दिले आहे. दिलेला धनादेश दोन लाखाचा होता की काय? या विचाराने संभ्रमित होऊन त्यांनी गटातील सदस्यांकडे विचारणा करू लागले त्याच कालावधीत बँकेच्या क्लोजिंग टाईम होऊन बँकेत एक लाखाचा तुटवडा होत असल्याचे जाणवले व एक लाख रुपयाची रक्कम शिव कृपा बचत गटाला गेली असून त्यांच्याकडे जास्त रक्कम गेली की काय? हया शंकेने त्यांनी बचत गटाचे अध्यक्ष संतोष चौधरी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून आपल्या गटाच्या धनादेशाच्या रकमेसह अधिक एक लाख रुपये आपल्या सदस्य कडे आले का, अशी विचारणा केली असता चौधरी यांनी खात्री दिली की आम्ही व्यापारी आहोत आमच्याकडे अधिक रक्कम आल्यास ती सुरक्षित राहील व ती आपल्याला नक्कीच भेटून जाईल .
चौधरी यांनी या बाबीची दक्षता घेत गजानन पुंडकर यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व प्रकार अध्यक्षांना कळवला त्यानुसार चौधरी यांनी बँकेचे व्यवस्थापकांना दूरध्वनीद्वारे आपली रक्कम सुरक्षित आहे असे कळवून एक लाख रुपये बँकेच्या व्यवस्थापकाकडे सुपूर्द केले. रक्कम ताब्यात घेताना अपशब्द होऊन काय बोलावे व काय करावे हे सुचत नव्हते वेळेने त्यांना आज ग्राहकाचे महत्व व वागणुकीची जाणीव करून दिली होती.
बँक कर्मचाऱ्यांनी गटाचे अध्यक्ष व सदस्यांचे आभार मानीत सत्कार साठी बँकेत निमंत्रित केले त्यावर अध्यक्ष संतोष चौधरी यांनी क्षणातच प्रतिक्रिया देत म्हणाले साहेब आम्हाला आपले फुल व सत्कार नको बँकेच्या ग्राहकांना माणुसकीची वागणूक द्या ग्राहकांना कमी लेखू नका वेळ ही सर्वांसाठी असते आज माझ्यावर उद्या तुमच्यावर अडीअडचणीत ग्राहकांना सहकार्य करा, हाच आमचा खरा सत्कार आहे. चौधरी यांच्या या प्रतिक्रियेतून बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये हिटलरची वागणुक स्पष्ट दिसून येत आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे बँकेतील गोंधळ कारभार थांबून ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील व बँकेचे आर्थिक व्यवहार सुद्धा वाढतील असे मत कळमनुरीचे नागरिक करत आहेत.