हिंगोलीत नव्याने ४३ रुग्णाची भर तर २७ रुग्णांना सुट्टी , दोघांचा मृत्यू
हिंगोलीत नव्याने ४३ रुग्णाची भर
तर २७ रुग्णांना सुट्टी , दोघांचा मृत्यू
हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी नव्याने ४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील २४ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर १९ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. २७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून दोघांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तपासणीत २४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसरात अकरा ,सेनगाव परिसर आठ,कळमनुरी परिसर पाच , असे एकूण२४ रुग्ण सापडले आहेत, तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १९ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील १८ , सेनगाव परिसर एक ,कळमनुरी परिसर सात, अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.
तर आज सुमारे २७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील ११ ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा ४ , कोरोना केअर सेंटर वसमत एक , तर कळमनुरी सेंटर येथील११ असे एकूण २७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या ६ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ३१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण २६०४ रुग्ण झाले असून, त्यापैकी २२७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले .आज रोजी दोन रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये वसमत व सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.