फिस मध्ये वाढ केल्यास संस्थाचालकावर कारवाई करणार शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड
फिस मध्ये वाढ केल्यास संस्थाचालकावर कारवाई करणार
- शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड
हिंगोली - राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र शैक्षणिक संस्था हया ऑन लाईन क्लासेसच्या नावाखाली फिवाढ करीत असल्याचा पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संस्थांनी फी मध्ये वाढ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले .
जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड हया स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हिंगोली दौऱ्यावर आल्या असता त्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठकी साठी आल्या होत्या, यावेळी पत्रकारांनी शैक्षणिक संस्था हया सक्तीने फी मध्ये वाढ झाल्याचे सांगून पालकांकडून पैसे उकळत असल्याचा मुद्दा छेडला असता, यावर पालकमंत्री म्हणाल्या की,सध्या कोरोना प्रादुर्भाव वामुळे पालकांची फी भरण्यास परिस्थिती नाही, असे सांगून काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.तर काहींच्या पगारात कपात झाली आहे, तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालकांची फी भरण्यास मनस्थिती राहिली नसल्याचे सांगून संस्थांना देखील आम्ही सांगितले फिस मध्ये कोणत्याही प्रकरची वाढ करू नये अश्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, शैक्षणिक संस्थांनी टप्या टप्या नुसार फी घ्यावी, सहा महिन्याला किंवा तीन महिन्याला फी घेऊन पालकांना सपोर्ट करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थाचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी एकमेकांच्या सहकार्याने हा प्रश्न हँडल करण्याचे सांगितले. याबाबत राज्य शासनाने( ता.८) मेला परिपत्रक काढले होते. परंतु हे प्रकरण मा. उच्य न्यायालयात गेल्याने त्यावर स्टे दिला गेला. आता सुप्रीम कोर्टात केस लढत असल्याचे शेवटी गायकवाड यांनी सांगितले.
राज्यसह ,जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून केवळ विद्यार्थ्या विना शिक्षक येऊन प्रवेश प्रक्रियेची कामे करीत आहेत. मात्र शैक्षणिक वर्ष कधी सुरु करणार असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता यावर अधिक न बोलता त्या थेट अधिकाऱ्यांच्या बैठकीला निघून गेल्या.