हिंगोली, आधी पगार, नंतरच माघार प्राध्यापकानी फुंकले ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग

आधी पगार, नंतरच माघार प्राध्यापकानी फुंकले ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग
        जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आक्रोश निवेदन


हिंगोली - विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक यांनी अनुदानासाठी आता पवित्र आक्रमक भूमिका घेतली असून, आता प्राध्यापकानी आपल्या हक्काच्या पगारासाठी रस्त्यावर उतरले असून आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आक्रोश निवेदन देऊन जिल्हाकचेरी समोर आधी पगार नंतरच माघार अश्या घोषणा देण्यात आल्या.


आतापर्यंत  शासनाने नुसते आश्वासन दिले पण प्रत्यक्ष हक्काचं पगार मात्र कागदावरच राहिला असून त्यासाठी संपूर्ण राज्यात ४ ऑगस्ट पासून अनुदानासाठी पुन्हा एकदा कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक बांधवांनी महाएल्गार पुकारला असून आता जोपर्यंत  अनुदान वितरणाचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आता माघार नाही असा पवित्रा घेतला आहे. यामध्ये १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णय नुसार प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढावा त्याचबरोबर अघोषित शाळा,महाविद्यालय यांना घोषित करून अनुदान द्यावे अशा विविध मागण्या संदर्भाचे आक्रोश निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,अर्थमंत्री, आणि शिक्षण मंत्री यांना देण्यात आले.


  येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेने संपूर्ण राज्यात ९ ऑगस्ट पासून रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करणार व याची सर्व जबाबदारी ही शासनावर असेल अशा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे. यावेळी हिंगोली जिल्हा कृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. आशिष इंगळे, उपाध्यक्ष प्रा. सुनील डुकरे, सचिव प्रा. बालाजी जांबूतकर संघटक प्रा. संतोष भालेराव,  प्रा.सुनील जगताप ,प्रा. गजानन वाबळे, प्रा.विष्णू उबाळे, प्रा. प्रशांत चाटसे प्रा. संतोष इंगळे, प्रा.अमोल सावळे, प्रा. गजानन जाधव, प्रा. शिवदास राऊत, प्रा. देविदास इंगोले, प्रा. शिवराज तरकसे ,प्रा.भगवान मस्के,प्रा. रणजित वानखेडे, प्रा. अरविंद सावळे, प्रा.विरोन पतंगे, प्रा. अरविंद सावळे, प्रा. दत्तराव इंगळे प्रा. सुर्यवंशी सर, प्रा. प्रकाश रणवीर यांच्यासह प्राध्यापक आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा