चिंताजनक ; जिल्ह्यात कोरोना बाधितांचे त्रिशतक पार
चिंताजनक ; जिल्ह्यात कोरोना बाधितांचे त्रिशतक पार
गुरुवारी नव्याने ६१ रुग्णाची भर तर एकाचा मृत्यु
हिंगोल - जिल्ह्यात गुरुवारी नव्याने ६१ रुग्णांची भर पडली असून ,एकाचा कोविडने मृत्यू झाला आहे . आता कोरोनाच्या बाधितांने त्रिशतकी आकडा गाठला असल्याने आरोग्य यंत्रणेला चिंता लागली आहे.
गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्ट द्वारे तपासणी केली असता यामध्ये ३६ रुग्ण आढळून आले आहेत. यात हिंगोली परिसर पाच व्यक्ती, कळमनुरी परिसर १७ , वसमत परिसर ५ व्यक्ती,औंढा परिसर तीन, सेनगांव परिसर सहा असे एकुण ३६ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर विठ्ठल नगर वसमत एक व्यक्ती, शास्त्री नगर वसमत एक व्यक्ती, वसमत नगर एक व्यक्ती, जवळा ता. वसमत एक व्यक्ती, असोलेवाडी ता. कळमनुरी एक व्यक्ती आणि सेनगांव शहर दोन व्यक्ती असे एकूण सात रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली शहरातील बियाणी नगरातील एकाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आरटी पीसीआर टेस्ट द्वारे आढळून आलेल्यात हिंगोली१४,गुगळ पिंपरी वसमत एक,वसमत कुरुंदा एक,औंढा शहर चार,असोंडा औंढा एक,शिरड शहापूर एक, कळमनुरी दोन,साखरा सेनगाव एक अश्या२५ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
तसेच आज कोरोना मुळे एका ५१ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला असून १२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू झाल्याची संख्या अकरा वर गेली असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
बरे झालेल्या रुग्णात यामध्ये नगर परिषद वसाहत एक, फलटण हिंगोली तीन, वंजारवाडा तीन,मेहराज कॉर्नर दोन,जिजामाता नगर एक, शेवाळा कळमनुरी एक असे बारा रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या तीन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण अकरा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १०३७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ६८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत ११ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले आहे.