जिल्ह्यात कोरोनाचे  नवीन ५३ रुग्ण तर ३० रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

जिल्ह्यात कोरोनाचे  नवीन ५३ रुग्ण तर ३० रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज


 कोरोना आलेख काही कमी होईना


हिंगोली,- जिल्ह्यात आज ५३ नवीन कोरोनाचा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख काही केल्या कमी होताना दिसून येत नाही ,हे आकडेवारीवरून दिसून येत आहे.


  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार कळमनुरी परिसर २३ व्यक्ती, कळमनुरी ग्रामिण १० व्यक्ती, वसमत परिसर ८ व्यक्ती, औंढा परिसर ६ व्यक्ती, सेनगांव परिसर १ असे एकुण ४८ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर कळमनूरी तालुक्यात ५ व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत.  आज ३०  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ८ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर  ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ११ रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
  
 जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे  एकूण १०९० रुग्ण झाले असून, त्यापैकी ७१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  जिल्ह्यात आतापर्यंत ११ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.



 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा