दिलासादायक ; हिंगोलीत नव्याने ७ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर तब्बल  ४३ रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक ; हिंगोलीत नव्याने ७ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर तब्बल  ४३ रुग्ण कोरोनामुक्त


हिंगोली - शनिवारी प्राप्त अहवालानुसार  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व  चार  रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर तब्बल ४३  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे सेनगाव दोन, वटकळी एक असे तीन रुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेले रुग्णात ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत एक,कौठा रोड वसमत एक,शास्त्री नगर वसमत एक,औंढा शहर एक असे चार जण आढळून आले आहेत.


आज रोजी एकुन ४३  रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील आठ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, तर कळमनुरी केअर सेंटर येथील ३३ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. असे एकूण ४३ रुग्ण आज बरे झाले आहेत.


आज पर्यंत हिंगोली जिल्हयात एकुण ८१५  रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ६०६  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांनासुट्टी देण्यात आली आहे .आज घडीला एकुन २०० रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि नऊ रुग्णाचा मृत्यु झाला असून शनिवारी एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला  असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील 
आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्या पैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर  दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप वर ठेवण्यात आले आहे. आज एकूण दहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा