खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णास टाळाटाळ केल्यास कारवाई करणार
खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णास टाळाटाळ केल्यास कारवाई करणार
जिल्हा शल्य चिकित्सक यांचा इशारा
हिंगोली - महात्मा फुले जण धन आरोग्य योजनेतील कोरोना रुग्णास खाजगी रुग्णालयात उपचार न मिळाल्यास किंवा टाळाटाळ केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले अंगीकृत योजने अंतर्गत येत असलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिला आहे.
जिल्ह्यात काही खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र हे खाजगी रुग्णालय उपचार न करताच निधी हडप करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे जिल्ह्यातील ज्या खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजने अंतर्गत रुग्णांना मोफत उपचार करण्याची परवानगी दिली आहे, मात्र हे रुग्णालय केवळ नावालाच असून सरकारी रक्कम वसूल करीत आहेत असे निदर्शनास आल्याने, जिल्हा शल्य चिकितस्क यांनी तातडीने विराट कौन्सिलची दखल घेत शासन मान्य अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार सुरू व्हावेत असे काळविले होते,एकूण खाटा पैकी८० टक्के खाटा या कोरोना ग्रस्त रुग्णासाठी राखीव ठेवण्याचे सांगितले आहे.तसेच ज्योतिबा फुले जन आरोग्य यंत्रणे अंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयानी महात्मा फुले योजने अंतर्गत कोविड रुग्णाकरिता उपलब्ध असलेल्या आजारामध्ये समावेश करून निशुल्क उपचार देण्यात यावा,यदाकदाचित रुग्णालयाने कोविड रुग्णास टाळाटाळ केली असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क अकरल्यास सदरील रुग्णालयावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ज्या खाजगी रुग्णालयात महात्मा फुले यांच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या खाजगी रुग्णालयाचे पितळ उघडे पडणार आहे.