हिंगोलीत बैलचोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीचा फरदाफाश
हिंगोलीत बैलचोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीचा फरदाफाश
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
हिंगोली - मागील दहा महिन्यापासून हिंगोली जिल्हयासह नांदेड परभणी , यवतमाळ जिल्हयात बैलचोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील बाळापुर हद्दीत बैल चोरीचे गुन्हे दाखल झाले असून आखाडयावर बांधलेले बैल चोरों जात असल्याणे शेतकरी चिंतातूर झाले होते . हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा , हिंगोली येथील पोलीस उप निरीक्षक एस. एस. घेवारे यांचे नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन करून सदर पथकाने हिंगोली जिल्हयात बैल चोरी झालेले सर्व घटनास्थळांना भेटी देउन गुप्त बातमीदार नेमून बैल चोरी करणारे आरोपीतांचा माग काढण्याचा प्रयत्न केला .
त्या दरम्यान गुप्त बातमीदार व सायबर तंत्रज्ञानाचे मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन टिम तयार करून रविवारी (ता. ९ ) नांदेड येथे जाऊन गुप्त बातमीदारा मार्फत व सायबर सेलच्या मदतीने बैलचोरी करणारे टोळीची ठाव ठिकाणाची माहिती घेउन आरोपी सय्यद इब्राईम रा.जुने पोस्ट ऑफीस , ईतबारा नांदेड, महमद फिरोज रा.आसरानगर , एअरपोर्ट नांदेड, शेख शमी शेख मतीन , ट्रक चालक , रा. मोहन्दीया कॉलनी देगलुर नाका नांदेड, मोहमद रियाज अब्दुल रौफ.रा.हरनबाग , देगलुर नाका नांदेड, सोहेल खान रा. एकवाल नगर धनेगांव ता.जि.नांदेड, शेख रा. मिल्लत नगर , देगलूर नाका नदिड, शेख इग्रान शेख अहेमद रा . नवी आबादी , शिवाजी नगर नांदेड, अब्दुल अमर अब्दुल शुबूर रा. शिवाजी नगर नांदेड, शेख अमेर रा. मिल्लत नगर नांदेड, शोयब उर्फ मामु रा . तेरा नगर नांदेड, मोहम्मद जावेद रा . महोमदीया कॉलनी नांदेड, अब्दुल जुबेर अब्दुल अस्मान लक्ष्मीनगर , देगलूर नाका नदिड .
या पैकी पाच जणांचा शोध घेउन त्यांना ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी हिंगोली जिल्यासह नांदेड , परभणी जिल्हयात बैलचोरी केल्याचे कबुल केले . सदर गुन्हयातील बैलचोरी करण्या करीता वापण्यात आलेले दोन मोटार सायकल व एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच ०४ ईएल ८७६० हा मोहम्दीया कॉलनी देगलुर नाका नांदेड येथील शेख शमी शेख मतीन , रा . मोहम्दीया कॉलनी , देगलुर नाका नांदेड याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा टाटा कंपनीचा १० चाकी ट्रकपण जप्त करण्यात आला आहे .
आरोपोतांना चोरी केलेल्या गाय , बैला बाबत अधीक विचारपूस करता त्यांनी सदरचे बैलचोरी करून आमचे व शेख शफी बिल्डर तसचे शेख इम्रान शेख अहेमद यांचे ओळखीचे बैल कापनारे कुरेशी यांना विक्री केले आहे . असे सांगत असल्याने त्यांचेकडून सदरचे बैल विकत घेणारे कुरेशी यांचे नाव निष्पन्न करून कुरेशी महोमद फयजान मोहमद इब्राहीम रा . हैदरखाग नांदेड महोमद फोरोज महोमद हुसेन कुरेशी रा. मदिना नगर नांदेड ,महोमद अहेमद महमद हुसेन कुरेशी रा.मदिनानगर नांदेड महोमद नसीम महोमद सालार कुरेशी रा.वाजेगाव नांदेड , आब्बास वहाब कुरेशी रा . हयातनगर ता.वसमत जिल्हा हिंगोली ह.मु. हिलाल नगर नांदेड, महोमद अन्सार महोमद बाबु कुरेशी रा . टायरबोट नांदेड यांना सोमवारी( ता.१० )ताब्यात घेउन त्यांना विश्वासात घेउन विचारपूस केली असता शफी बिल्डर व त्याचे साथीदार यांनी ट्रकमध्ये चोरी करून आनलेले गाय , बैल , गोर्हे चोरीचे असल्याचे आम्हाला माहित असल्याने त्यांचेकडून चालु असलेल्या किमती पैक्षा अर्धा किमतीमध्ये विकत घेउन ते आम्ही त्यादिवशीच कापून त्यांचे मांस नांदेड येथील विविध भागात विकी केल्याचे कबुल केल्याणे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे .
आरोपीतांकडून पोस्टे आखाडा बाळापुर येथील नमुद दोन गुन्हयातील आरोपीतांनी वापरलेले टाटा कंपनीचा १० चाकी ट्रक , एक मोटार सायकल , मोबाईल व नगदी रूपये असे बाळापुर , कळमनुरी, औंढा, बासंबा अंतर्गत दाखल असलेल्या वेगवेगळया एकुण सहा गुन्हयातील एकूण मुद्देमाल २० लाख ६६ हजाराचा माल वरील पाचही आरोपीतां कडून हस्तगत करण्यात आला आहे .
सदर गुन्हयातील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे अधिक विचारपूस करता त्यांनी हिंगोली जिल्हयात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हयातील गाय , बैल , गोरा , वासरू असे चोरी केल्याचे सांगत आहेत तसेच नांदेड, परभणी तसेच यवतमाळ जिल्हयातील सुध्दा बैलचोरी केल्याचे सांगत असल्याने सदर ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपीतांना मुद्देमालासह आखाडा बाळापुर येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही
पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक शिवसांव घेवारे , किशोर पोटे , अभय माकणे , हमुमंत नकाते , सुवर्णा वाळके , बालाजी बोके , विलास सोनवणे , शंकर जाधव , संभाजी लेकुळे , शेख रेशमा , पारू कुडमेथे, भगवान आडे , आशिष उंबरकर , विट्ठल कोळेकर , विशाल घोळवे , राजुसिंग ठाकुर , किशोर कातकडे , शंकर ठोंबरे , ज्ञावेश्वर सावळे , किशोर सावंत , दिपक पाटील , आकाश टापरे , विठठल काळे , तसेच सायबर सेलचे निलेश हलगे , जयप्रकाश झाडे , सुमीत टाले , इरफान पठाण , रोहीत मुदीराज , आदींनी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या धडक कारवाई मुळे हे सत्य उघडकीस आले आहे. लॉकडाऊन काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असता त्यावेळी पोलीस यंत्रणा कुठे गेली होती असा सवाल उपस्थित केला जात आहे.