धर्माबाद नगरपालिकेच्या त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करा..

*धर्माबाद नगरपालिकेच्या त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करा...(त्या नऊ नगरसेवकांची मागणी)*


* नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*


*नांदेड:जिल्यातील धर्माबाद नगरपालिकेतील त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे                               


दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची रास्त मागणी धर्माबाद नगरपालिकेतील नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे .                                      


          सदरील चारही कर्मचाऱ्यांनी बोगस गावठाण, दाट वस्ती, व नाव परिवर्तन अशा प्रकरणात अतिशय बोगस कामे केल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झाल्यामुळे त्याबाबत तत्कालीन सचिव मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला पण त्यांनी समाधानकारक खुलासा न दिल्यामुळे उपरोक्त चार पैकी तिघांना निलंबित केले होते .व कार्यालयीन सचिव तथा कर अधीक्षक रूकमाजी भोगावर यांच्या निलंबनाची कार्यवाही माननीय संचालक नगर विकास मंत्रालय वरळी मुंबई  यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती त्या कार्यवाही वरील निर्णय अद्याप आला नसला तरी धर्माबाद नगरपालिकेतील उपरोक्त चार कर्मचाऱ्यांनी ज्यामध्ये रुखमाजी भोगावर.मारुती उल्लेवाड.नागेश संगणा अपुलोड व रमेश विठ्ठलराव घाटे  यांनी अक्षम्य अशी बनावट कामे करून नगरपालिका प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली आणि कोट्यवधीच्या पैशांचा गैरवापर केला म्हणून त्यांना निलंबनावरच न सोडता त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी धर्माबाद नगरपालिकेचे गटनेता प्राध्यापक बी.ए. गोणारकर.नगरसेवक संजय पवार. सायारेड्डी गंगाधररोड,  निलेश पाटील.रिंकू सुरकुटवार, कविता बोल्मलवार.महादाबाई वाघमारे.सुनिता जाधव. व अहेमदी बेगम आबेदअली ह्या नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली असल्यामुळे धर्माबाद  शहरात पुन्हा खळबळ उडाली असून सदरील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या काही नगरसेवकाची व व राजकीय वरद हसता मुळे सदरील कर्मचाऱ्याना अशी हिंमत झाली असून त्यामुळेच एका राजकीय पक्षतील  मोठा नेत्याने आपले राजकीय वजन वापरून मुख्याधिकारी यांची बदली करण्यात आली असल्यामुळे हे कर्मचारी सुटकेचा श्वास घेतला होता. पण 9 नगरसेवकांनी पुन्हा या कर्मचार्याना विभागीय चोकशी करण्याची मागणी करून पुन्हा स्पॉट घडून आणला आहे. खर्च निपक्ष चोकशी होऊन दोषी कर्मचारी व त्यांना बगल देणाऱ्या लोकांन वर कार्रवाही करतील का याकडे सर्व धर्माबाद वाशीयांचे लक्ष लागले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा