शेतकऱ्यांच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले


शेतकऱ्यांच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले


शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला 
आयएएस


हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सुरेश  शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे . मुलागा अधिकारी झाल्याचा आनंद आई - वडिलांना झाला आहे.


 वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील सुरेश कैलासराव शिंदे यांचे शिक्षण पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेत झाले . इयत्ता सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे येथे झाले . त्यानंतर त्यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला . महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले . त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली . सन २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सन २०१५ साली पूर्ण केला . या अभ्यासक्रमात ८२ टक्के गुण मिळविले त्यानंतर त्यांना आयटी सेक्टर मध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर देखील आली . मात्र  त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली . २०१६ त्यांनी दिल्ली येथे जाऊन लोकसेवा आयोगाच्या तयारी सुरू केली . मुलगा अधिकारी होणार या आशेवर मागील १८ वर्षांपासून शेतात राहणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी सुरेश शिंदे यांना प्रोत्साहन दिले . आई - वडिलांचे कष्टाचे चीज व्हावे यासाठी त्यांनी मेहनत करून अभ्यास केला . सन २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयश आले, खचून न जाता त्याने मात्र अपयश हा यशाचा पहिला मार्ग लक्षात घेऊन  नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली . त्यानंतर या तिसऱ्या प्रयत्नात यश त्यांच्या पदरी पडले . आज निकाल जाहीर होताच त्यांनी गावी शेतात राहणाऱ्या आई - वडिलांना परीक्षा पास झाल्याची माहिती दिली . मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा काय आहे याची माहिती त्यांच्या आई - वडिलांना नाही . मात्र मुलगा मोठा अधिकारी झाला आहे हे कळलेल्या आई - वडिलांच्या डोळ्यातुन मात्र आनंदाच्या धारा वाहू लागल्या . सुरेश शिंदे यांनी देशात ५७४ वा क्रमांक मिळवला आहे . ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले . विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार अभ्यास सुरू केल्यास यश निश्चितच मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा