जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती 

जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती 


जिल्हा परिषदेचे सीईओ शर्मा यांनी काढले आदेश


हिंगोली - जिल्ह्यातील (ता.१८) ते ३१ ऑगस्ट अखेर मुदत संपलेल्या ४६५ ग्रामपंचायतीच्या प्रशासकांच्या नियुक्त्याचे आदेश सोमवारी (ता.१७) जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांनी काढले असल्याने प्रशासक नियुक्तीचा तिढा सुटला आहे.


मागील सहा महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा २०२० मध्ये राज्यातील ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका देखील निवडणूक विभागाने रद्द केल्या आहेत.यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रशाशक नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले होते. यामुळे राजकीय पक्षांचा कार्यकर्त्यांचा भरणा होईल या भीतीपोटी काहींनी आक्षेप नोंदविला होता, तर काहींनी न्याया लयात धाव देखील घेतली आहे. तर काहींनी राजकीय पक्षाचे नेते न घेता यावर शासकीय सेवितील व्यक्तीलाच प्राधान्य द्या असा काहीसा सूर होता.
त्यानंतर राज्य शासनाने ग्रामपंचायत वर प्रशासक नियुक्तीचे अधिकार त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविले होते.


त्यानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांनी सोमवारी (ता.१७) जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायती च्या निवडणुकीचा कार्यकाळ १८ते ३१ ऑगस्ट संपुस्टात  आल्याने सर्व ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींचे काहीच चालणार नाही. केवळ प्रशासक हेच पुढील निवडणूक होईपर्यंत कामकाज पाहणार आहेत.


हिंगोली तालुक्यातील ८० ग्रामपंचयात बरखास्त केल्या असल्याने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केला आहे. यामध्ये ,बळसोंड ग्रामपंचायत येथे प्रशासक म्हणून हिंगोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे ,अंभेरी येथे विस्तार अधिकारी तुप्पड,कारवाडी मधुकर राऊत, इसापुर येथे कनिष्ठ अभियंता बी. पी. लहाने ,पिंपरखेड येथे बासंबा येथील केंद्र प्रमुख भुजंगळे यांची नियुक्ती केली आहे.याच प्रमाणे हिंगोली तालुक्यातील ८० ग्रामपंचायत प्रशासक पदी नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यात ४६५ ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्या पासून व नियुक्ती केलेल्या तारखेपासून प्रशासक काम पाहणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका होईपर्यंत प्रशाशक काम पाहणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा