दोन लाखापेक्षा अधिक गरजवंतांना शिवभोजन थाळीचा आधार
दोन लाखापेक्षा अधिक गरजवंतांना शिवभोजन थाळीचा आधार
हिंगोली - जिल्ह्यात शिवभोजन योजनेतंर्गत लाँकडाऊन कालावधीत शिवभोजन योजनेचा दोन लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी दिली.
शासनातर्फे गरीब व गरजु व्यक्तीना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सात माहिन्याखाली शिवभोजन ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा आजपर्यंत लाभार्थ्यांनी मोठा लाभ घेतला आहे. लाँकडाऊन कालावधीत गरजुना याचा फायदा झाला आहे.
जिल्ह्यात या योजनेत नऊ केंद्रामार्फत दोन लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या केंद्रात हिंगोली येथे तीन यात साई माऊली यांच्याकडे दोनशे थाळीचे वाटप केले जाते. तर सुभाष वर्मा व साई भोजनालय यांना प्रत्येकी शंभर थाळीचे उद्दिष्ट आहे.
कळमनुरी येथील प्रकाश भोजनालय व जय माता बचतगट यांना प्रत्येकी ७५ थाळी देण्यात आल्या आहेत.
औंढा नागनाथ येथील व्यंकटेश रेस्टॉरंट व जय मल्हार ग्रामविकास प्रतिष्ठान यांना प्रत्येकी ७५ थाळी तसेच सेनगाव व वसमत येथेही ७५ थाळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लाँकडाऊन कालावधीत या केंद्रात लाभार्थ्यांच्या रांगा लागत होत्या हि योजना लाभार्थ्यांसाठी वरदान ठरली आहे. गरीब, गरज वंताना या योजनेचा लाभ मिळाला आहे.