हिंगोलीत नव्याने १९ रुग्ण पॉझिटिव्ह तर ९४ रुग्ण कोरोनामुक्त
हिंगोलीत नव्याने १९ रुग्ण पॉझिटिव्ह तर ९४ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख घसरतोय
हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी १९ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सुमारे ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख आता घसरत चालला असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.
पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णात यातील अकरा रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले तर आठ रुग्ण हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १९ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये ११ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये तर ८ रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर सात,
तर औंढा परिसर तीन, कळमनुरी एक, असे ११ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. तसेच आरटीपीसीआर तापसणीत ८ रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर तीन, कळमनुरी चार, वसमत एक असे आठ रुग्ण सापडले आहेत.
आज रोजी एकूण तब्बल ९४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यात खालील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये कोरोना केअर सेन्टर लिंबाळा साठ,आयसोलेशन वॉर्ड हिंगोली दहा, तर वसमत येथील कोरोना सेन्टर चार रुग्ण , तसेच कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील अकरा ,सेनगाव सेंटर येथील नऊ असे एकूण ९४ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १२८६ रुग्ण झाले असून, त्यापैकी ९६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या पैकी १३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ऑक्सिजन सुरु आहे.तर तीन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप मशीनवर ठेवण्यात आले आहे.१६ रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.