जिल्हा परिषदेच्या २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह

जिल्हा परिषदेच्या २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह




अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास


हिंगोली -  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह ,सीईओ शर्मा यांना कोरोना बाधा झाल्याने अधिकारी,कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे शनिवारी भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली, या टेस्ट मध्ये सर्वच कर्मचारी निगेटिव्ह आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा यांच्यासह आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांच्यासह कर्मचारी प्रशांत तुपकरी यांना कोरोना लागण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्य विभागात सुरुवातीला कोरोना शिरकाव झाला होता. त्यानंतर सीईओ शर्मा यांना कोरोना झाल्याने सर्व इमारत सानिटाईझ करून तीन दिवस इमारत बंद करण्यात आली होती. तसेच सर्व विभाग प्रमुखांना
 क्वारंटाइन केल्याने कर्मचाऱ्यात भीती निर्माण झाल्याने कर्मचारी येत नसल्याने जिल्हा परिषदेमध्ये मागील आठ दिवसापासून शुकशुकाट दिसून येत होता.


कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व जिल्हा परिषदेचा विस्कळीत पडलेला कारभार सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा ,जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्याची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी ,अतिरिक्त सीईओ डॉ.मिलिंद पोहरे, कॅफो देविदास हिवाळे ,महिला बालकल्याण विभागाचे गणेश वाघ, पंचायत विभागाचे नितीन दाताळ ,पाणी व स्वछता विभागाचे आत्माराम बोन्द्रे ,आदींनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार शनिवारी( ता.१५) ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. विशेष म्हणजे घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये एकही कर्मचारी पॉझिटिव्ह आला नाही सर्व कर्मचारी निगेटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वर्गातील भीती दूर झाली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी भेट देऊन न घाबरता कर्मचाऱ्यांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २७० कर्मचारी निगेटिव्ह आल्याने कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत.


रॅपिड अँटीजन टेस्टसाठी डॉ. देवेन्द्र जायभाये  यांच्या पथकाने सर्व कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने घेऊन तातडीने अहवाल जाहीर करून तपासणी साठी परिश्रम घेतल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यातील भीती दूर झाल्याने सोमवार पासून जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ववत सुरु होणार आहे. तसेच तपासणी झाल्यानंतर संपूर्ण इमारत सानिटाईझ करून फवारण्यात आली. यानंतर पुन्हा सर्व पदाधिकारी, जीप सदस्य यांची टेस्ट घेतली जाणार आहे. सोमवार पासून जिल्हा परिषदेच्या आवारात किंवा आतमध्ये प्रवेश करावयाचा असेल तर चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. आत मध्ये विना चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे धनवंतकुमार माळी यांनी सांगितले.


सोमवार पासून कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित राहून  मागील आठ दिवसापासून ठप्प पडलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, जे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणार नाहीत  किंवा गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा