दिलासादायक;  हिंगोली, शनिवारी १५ रुग्ण कोरोनामुक्त तर आठ पॉझिटिव्ह

दिलासादायक;  हिंगोली शनिवारी १५ रुग्ण कोरोनामुक्त तर आठ पॉझिटिव्ह


अँटीजन तपासनीत तीन रुग्ण सापडले
 
हिंगोली -  सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार  शनिवारी पंधरा रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने आठ रुग्णाची भर पडली आहे. यातील तीन रुग्ण हे अँटीजन तपासणीत सापडले असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.


शनिवारी प्राप्त अहवालानुसार पंधरा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील बारा रुग्ण असून, यात तीन जुने पोलीस स्टेशन, शाहू नगर चार, जिल्हा परिषद वसाहत तीन हरवाडी दोन अशा बारा रुग्णाचा समावेश आहे. तसेच कोरोना केअर सेंटर सेनगाव येथील एक रुग्ण बरा झाला आहे. यामध्ये गंगानगर एकयाचा समावेश आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्ड येथील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये वसमत शिवाजी नगर येथील दोघांचा समावेश आहे.


जिल्हा रुग्णालयाकडून  प्राप्त अहवालानुसार शनिवारी (ता.१) आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस रोड हिंगोली येथील एक ६५वर्षाचा पुरुष रुग्ण असून तो खाजगी रुग्णालयात अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आला आहे.तालुक्यातील खंडाळा येथील एका साठ वर्षाच्या महिलेला कोरोना ची लागण झाल्याचे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले. याशिवाय परभणी पूर्णा जांकशन येथील महावीर नगरातील एका२७ वर्षीय महिलेला कोरोना बाधा झाल्याचे अँटीजन टेस्ट मध्ये उघड झाले आहे. तसेच हिंगोली येथील यशवंत नगर येथे तीस वर्षाच्या महिलेस लागण झाली आहे. वसमत बाराशिव येथे एक२१ वर्षीय महिला तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे तिघे सापडले असून यात ५०,३० महिला असून एका दहा वर्षाच्या मुलीला लागण झाली आहे.


हिंगोली जिल्हयात कोरोनाचे  एकुण ६६२ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ४५० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन २०४  रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ८ कोऱोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे .  हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन 
७५६३ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६६८६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६९३८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ६०० व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २१२ जणांचे अहवाल येणे ,  स्वॅब घेणे प्रलंबित आहे . ८  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे .


आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायप्याप मशीन वर ठेवले आहे. आज रोजी एकूण १९ रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा