स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा, नगरपंचायतचे कामकाज बंद
स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा, नगरपंचायतचे कामकाज बंद
सेनगाव - शहरातील नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक यांना कोरोना लागण झाल्याने ते कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना व १९ नागरिकांना संस्थामक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने सेनगाव नगरपंचायत मधील कामकाज हे काही दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
सोमवारी अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी चालू असून शहरातील नागरिकांना आपल्या समस्या व इतर बाबीसाठी ई-मेल किंवा व्हाट्सअपचा वापर करण्याचे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी केले आहे.
सेनगाव शहरात कोरोना संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील एका पोलीस उपनिरीक्षकास नुकतीच कोरोनाची लागण झाल्याने सेनगाव पोलीस स्टेशनचे कामकाज काही दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा शहरातील स्वच्छता कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांची( ता.२२) ऑगस्ट रोजी कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान एक स्वच्छता निरीक्षक यांचा कोविंड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या बाधित कर्मचाऱ्यास तातडीने कोविंड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या १९ कर्मचारी व नागरिकांना विलिनीकरण केंद्रात ठेवण्यात आले व नगरपंचायत कार्यालय व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे .शहरातील नागरिकांना काही अत्यावश्यक बाबी व विकासात्मक समस्या साठीसाठी नगर पंचायतच्या ईमेलवर पत्र व्यवहार करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे.