पोलीस उपनिरीक्षकाला कोरोना बाधा,अधिकारी, कर्मचारी क्वारंटाइन
पोलीस उपनिरीक्षकाला कोरोना बाधा,अधिकारी, कर्मचारी क्वारंटाइन
सेनगाव पोलीस ठाण्याचे कामकाज बंद
सेनगाव - सेनगाव शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराची मानवी साखळी थांबावी यासाठी तालुका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपायोजना केल्या जात आहे. आज सेनगाव येथील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना काल रात्री जोराचा ताप आल्याने त्यांनी आज स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोविंड-19 या य आजाराची तपासणी केली असता, यांचा तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सेनगाव पोलीस स्टेशन हे कोरोना कंटेनमेंट झोन झाल्याने सेनगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण कामकाज बंद असल्याचा फलक पोलीस ठाणे प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
जिल्हाअधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाच्या नियंत्रणाखाली शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला होता. यामध्ये शहरातील ९९२ व्यापाऱ्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट अंतर्गत तपासणी करण्यात आल्या होत्या .त्यामध्ये २० व्यापाऱ्यांना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता .व्यापाऱ्यांना कोवाड-19 या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर उर्वरित चार रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अशा शहरातील २४ रुग्णांना कोविंड-19 या आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर शहरातील कोरोला केअर सेंटर मध्ये उपचार चालू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड यांनी दिली.
सेनगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना काल रात्री जोराचा ताप आल्याने त्यांनी आज स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोविंड-19 या आजाराची तपासणी केली असता त्यांचा तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सेनगाव पोलीस ठाण्यात चार अधिकार्यासह ५२ कर्मचारी असे एकूण ५६ कर्मचाऱ्यांचा स्टॉप कार्यरत आहे. येथील पोलीस उपनिरीक्षक यास कोरोनाची लागण झाल्याचे कळताच पोलीस ठाणे हे कोरोना कंटेनमेंट झोन मध्ये गेल्याने व सर्व पोलिस अधिकार्यासह कर्मचाऱ्यांनी स्वतः होऊन होम क्वारंटाईन करून घेतल्याने सेनगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण कामकाज बंद करण्यात आले असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या ठाणे हद्दीतील संपूर्ण कामकाज नरसी नामदेव ठाण्याकडे कामकाज दिले असल्याचे सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत काही तक्रारी किंवा घटना घडल्यास पोलीस स्टेशन नरसी नामदेव यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .या कोरोना बाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात कोण कोण आले यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतल्या जात आहे व पोलीस अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे लवकरच स्वाप घेऊन त्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी दिली. शहरात कोरोना संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तहसीलदार जीवककुमार कांबळे, नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. देवकर, विद्या चव्हाण ,स्वाती पारीसकर, संदीप राठोड, अनिल नायकवाल ,गजानन ढेंगरे, बालाजी आडे, यासह तहसील प्रशासन, नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग कसोशिने प्रयत्न करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.