हिंगोलीत नव्याने ३७ रुग्णाची भर
हिंगोलीत नव्याने ३७ रुग्णाची भर
हिंगोली - जिल्ह्यात गुरुवारी ३७ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील आठ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले तर २९ रुग्ण हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे. त्यामुळे मृत्यू संख्या १५ वर पोहचली आहे.
गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३७ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये ८ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये तर २९रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर पाच,
रुग्ण असून यात आनंद नगर, भोईपुरा,लासीना येथील रुग्णाचा समावेश आहे.तर औंढा परिसर एक, सेनगाव परिसर एक, कळमनुरी परिसर एक असे आठ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. तसेच आरटीपीसीआर तापसणीत २९ रुग्ण आढळून आले आहेत.
आज रोजी एकूण ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यात खालील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली आठ, तर वसमत येथील १५ रुग्ण ,सेनगाव परिसर एक, तसेच कळमनुरी परिसरातील आठ रुग्ण,औंढा परिसर सहा असे ३८ रुग्ण बरे झाले आहेत. आज रोजी औंढा तालुक्यातील रुपुर येथील५० वर्षीय वृद्धाचा सामान्य रुग्णालयात कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू झालेली संख्या १५ वर गेली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १२६७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ८७३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या पैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ऑक्सिजन सुरु आहे.तर चार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्यापवर ठेवण्यात आले आहे.१८ रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.