हिंगोली, जामठी बुद्रुक व जयपूर या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

जामठी बुद्रुक व जयपूर या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन



 हिंगोली -   जिल्ह्यातील जामठी बुद्रुक व जयपुर या दोन ग्रामपंचायतींना उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आयएसओ. 9001 मानांकन दर्जा मिळाला आहे . 


सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीं पैकी ९ ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता . यापैकी जामठी बुद्रुक व जयपूर या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन दर्जा प्राप्त झाला आहे . सेनगाव पंचायत समितीला तसे प्रशस्तीपत्र आज प्राप्त झाले आहे . महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प होता .दरम्यान, या दोन्ही ग्रामपंचायतने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी नियोजनाने केली आहे. १४ व्या वित्त आयोगातून घरकुल, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.


गावकऱ्यांना देखील सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रमाणपत्र आँनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण केले आहे. जयपुर ग्रामपंचायतने स्वतंत्र मंगलकार्यालय बांधले आहे. गाव टँकर मुक्त केले आहे. यासाठी गाव तलाव करून पाणी उपलब्ध झाले आहे.


ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अ,ब,क,ड श्रेणीत लाऊन जतन केले आहे. तसेच परिसर स्वच्छता करून वृक्षारोपण केले आहे. जयपूर ग्रामपंचायतच्या सरपंच सीताबाई पायघन, शिवाजी पाघघन, ग्रामसेवक संदीप काळे यासह सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. तर जामठीचे सरपंच मधूकर जाधव यांच्यासह सर्वानी पुढाकार घेतला आहे.दरम्यान, औरंगाबाद पारिजात संस्थेकडून आयएसओ नामाकंन मिळविले आहे.


चौकटीचा मजकूर
-----------------------
 जयपूर ग्रामपंचायतने शासनाच्या अनेक योजना गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात राबविल्या आहेत. गावात पाण्याची देखील सोय केली आहे. या सर्व कामाची दखल घेत आयएसओ मानाकंन मिळाले आहे.
संदीप काळे
ग्रामसेवक जयपूर


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा