कळमनुरी, १८ वर्षीय युवकाचा विहिरित बुडुन मृत्यु

१८ वर्षीय युवकाचा विहिरित बुडुन मृत्यु


कळमनुरी -  शहरातील बिलालनगर  भागात राहणारया १८ वर्षीय युवकाचा  शेतातील विहिरीत  बुडुन मृत्यु झाल्याची १६ ऑगस्ट रोजी  दुपारी  दोनच्या सुमारास घडली.


 या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील बिलाल नगर येथील  सय्यद तौखीर सय्यद जावीद वय १८ हे दुपारी  वाई शिवारातील अफरोज पठाण यांच्या शेतात कामा साठी गेला होता  शौचास जातो म्हणून गेला पण खुप वेळे पर्यंत परतला नाही शोध घेतला असता शेतात असलेल्या विहरी जवळ त्याचा शर्ट आढळून आला   यामुळे गोताखोर तुळशिराम भिसे, अप्पा कदम, कांता पाटिल,  पठान,  शेख मुख्तार,  फारुक शेख, ईम्रान नाईक यांनी पाण्यात उतरुन शोध घेतला असता दोन तासाच्या परिश्रम नंतर सय्यद तौखीर याचा मृतदेह  विहिरीत हाती लागला. मयत युवक हा गरीब कुटुंबियातुन असून चार भावन्डे पैकी एका भावाचा चार ते पांच वर्षा पूर्वी तळ्यात बुड़ुन मृत्यु झाला होता .आज पुन्हा कुटुंबिया वर दुखाचा डोंगर कोसळला ,सदर घटनेची वार्ता पसरताच शहरात शोकाकुल वातावरण झाले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा