हिंगोलीत व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक जाहीर

हिंगोलीत व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक जाहीर


हिंगोली, - हिंगोली  व्यापाऱ्याच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली शहर व परिसरातील व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट संदर्भात वेळापत्रक जाहीर केले आहे . यानुसार संबंधित जे व्यापारी तपासणी करून घेतील त्यांनाच आपली दुकाने उघडण्याचा अधिकार राहील . अशी माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली . हिंगोली शहर व उपविभागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे . या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत . 


त्याच अनुषंगाने शुक्रवारी  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी बैठक घेतली होती . त्यानुसार हिंगोली शहरातील व परिसरातील व्यापारी व डॉक्टर यांची तपासणी करण्यात येणार आहे.त्यानुसार सोमवारी ता. १०  हिंगोली शहर व परिसरातील कृषी सेवा केंद्र मालक व सर्व औषध विक्रेते यांची सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत सरजुदेवी भिकूलाल भारुका कन्या शाळेमध्ये व माणिक स्मारक विद्यालय मध्ये तपासणी करण्यात येणार आहे . त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी शहर व परिसरातील सर्व भाजीविक्रेते फळविक्रेते यांची याच ठिकाणी सदर वेळेमध्ये तपासणी करण्यात येईल .  १२ ऑगस्ट रोजी शहर व ग्रामीण भागातील सर्व किराणा विक्रेते यांची सदर जागेवर सकाळी नऊ ते अडीच या दरम्यान तपासणी करण्यात येईल .  


१३ ऑगस्ट रोजी हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व खाजगी वैद्यकीय दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरांची तपासणी करण्यात येणार आहे . सदरील व्यवसायाशी निगडित असणाऱ्या व्यक्तीने नेमून दिलेल्या तारीख व वेळेनुसार उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे .


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा