हिंगोलीत नव्याने ५८ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर पाच रुग्ण बरे

हिंगोलीत नव्याने ५८ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर पाच रुग्ण बरे


हिंगोली - गुरुवारी  प्राप्त अहवालानुसार  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन ५८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी सहा रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व  ५२  रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट ब्दारे आढळून आले आहेत व पाच रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. 


रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे महसूल कॉलनी एक, फलटन हिंगोली तीन,साईनगर कळमनुरी दोन, हे सहारुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत.


तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेले रुग्णात सरस्वतीनगर एक,पेन्शनपुरा एक, रिसाला बाजार दोन, जीप क्वार्टर एक,देव गल्ली एक,संमती कॉलनी तीन,गाडीपुरा नऊ,नगर परिषद कॉलनी तीन,महादेव वाडी एक,वंजारवाडा तीन, तोफखाना दोन,बोरी शिकारी एक,गोरेगाव सेनगाव चार,गोंदणखेडा सेनगाव एक,वसमतनगर सहा,वापटी वसमत एक,पंचायत समिती वसमत एक,जुम्मापेठ वसमत एक ,चिखली वसमत एक,कलंबा ,सती पांगरा वसमत प्रत्येकी एक,डोंगरकडा कळमनुरी दोन,विद्यानागर, भीमनगर कळमनुरी प्रत्येकी एक, बीएसएनएल कळमनुरी एक अशा ५२ रुग्णाचा समावेश आहे.


 आज रोजी एकुन पाच  रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील दोन, विठ्ठल कॉलनी, वंजार वाडा येथील रुग्ण बरे झाले आहेत.तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील तीन रुग्ण मंगळवारा हिंगोली येथील बरे झाले आहेत.


 आज पर्यंत हिंगोली जिल्हयात एकुण ७९६  रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ५५५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांनासुट्टी देण्यात आली आहे .आज घडीला एकुन २३३ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ८ रुग्णाचा मृत्यु झाला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील 
आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्या पैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप वर ठेवण्यात आले आहे. आज एकूण१२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा