शुक्रवारी नव्याने ३९ रुग्ण पॉझिटिव्ह तर १९ रुग्ण कोरोनामुक्त
शुक्रवारी नव्याने ३९ रुग्ण पॉझिटिव्ह तर १९ रुग्ण कोरोनामुक्त
हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ३९ कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील सर्व रुग्ण हे आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर १९रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या
आरटीपीसीआर अहवालानुसार आढळून आलेल्या रुग्णात हिंगोली परिसरात २३ रुग्ण सापडले आहेत,यामध्ये रिसाला बाजार ,बाभूळ गाव, विवेकानंद नगर, जवळा बाजार, बोरी शिकारी, चिंचोली, पांगरी, हिवर खेडा, अंतुलेनगर ,नगर परिषद वसाहत या परिसराचा समावेश आहे. तर कळमनुरी परिसरात १६ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आखाडा बाळापूर, जवळा पांचाळ, डोंगरकडा ,असे ३९ रुग्णाचा समावेश आहे.
तर आज १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील सहा , वसमत कोरोना केअर सेन्टर येथील आठ, तर कळमनुरी सेंटर येथील पाच असे एकूण १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ११ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या ४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १४३३ रुग्ण झाले असून, त्यापैकी १२२८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण १८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.