डीएचओ डॉ.पवार ,आरोग्य कर्मचारी तुपकरी यांचा कोरोनावर विजय

डीएचओ डॉ.पवार ,आरोग्य कर्मचारी तुपकरी यांचा कोरोनावर विजय




हिंगोली - जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व आरोग्य कर्मचारी प्रशांत तुपकरी हे दोघेही शनिवारी कोरोनावर मात करून घरी परतल्याने आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रुग्णालयात कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.


दरम्यान,जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी 
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागासह, महसूल, पालिका कर्मचारी ,पोलीस कर्मचारी ,रात्रंदिवस काम करीत आहेत.पर राज्यातून आलेल्या व्यक्तींची नोंद घेणे ,कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्यास आयोसोलेशन वॉर्डात भरती करणे, आशा व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून गावपातळीवर तपासण्या करणे आदी कामे आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.


दरम्यान, यापूर्वी आरोग्य विभागातील डॉक्टरसह दोन कर्मचाऱ्याला कोरोना बाधा झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानुसार हा आजार पसरवू नये म्हणून आरोग्य विभागातील ३५ कर्मचारी क्वारंटाइन झाले होते. त्यामुळे आरोग्य विभाग काही दिवसासाठी सील केला होता.  गेली पंधरा दिवसापासून येथील जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार,आरोग्य कर्मचारी प्रशांत तुपकरी हे दोघेही कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळेच त्यांना बाधा झाली होती. गेली पंधरा दिवस ते जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत होते. अखेर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या दोघांनाही कोरोनावर मात करून विजय मिळविला आहे ,शनिवारी सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास, नर्स श्रीमती पवार ,आदींनी दोघांचे ही जोरदार पुष्पगुछ देऊन स्वागत करून सुट्टी देण्यात आली.


डॉ. शिवाजी पवार जिल्हा परिषदेच्या वसाहतीत प्रवेश करताच त्यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर प्रशांत तुपकरी हे सपत्नीक कोरोनावर मात केल्याने या दोघांचे अकोला बायपास परिसरात असलेल्या रामकृष्णा नगरात परतल्या नंतर त्यांचे नगरातील नागरिक, महिलांनी जोरदार पुष्पवृष्टी उधळत स्वागत केल्याने दोघेजण भावूक झाले होते. नगरातील नागरिकांनी देखील जिव्हाळा दाखविला आहे. यातून हे निष्पन्न होते की, कोरोना हा सर्वांना होईल परंतु खचून न जाता किंवा एखाद्याला वाळीत न टाकता आपलेसे समजून घेण्याचा जणू संदेश इतरांना दिला आहे. प्रशांत तुपकरी यांनी देखील नगरातील नागरिकांचे वमित्र मंडळींचे आभार व्यक्त केले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा