देवणी तालुक्यातील 9 तांड्यावर गोर सेना शाखा फलकाचे अनावरण
*देवणी तालुक्यातील 9 तांड्यावर गोर सेना शाखा फलकाचे अनावरण*...
प्रतिनिधी/
देवणी तालुक्यातील मौजे इंद्रा नगर,लक्ष्मण तांडा,सेवादास नगर,नेकनाळ,वसंतराव नाईक, धनेगाव आदी तांड्यावर गोर सेना शाखा फलकाचे अनावरण संगटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बंजारा समाजावरील होणाऱ्या अन्याय,अत्याचार,हक्क व अधिकार यासाठी संपूर्ण भारतात सामाजिक स्वरूपात काम करणारी अग्रगण्य संगठना म्हणुन गोर-सेनेचा ऊल्लेख केला जातो.
त्याचा एक भाग म्हणुन आज देवणी तालुक्यातील नऊ तांड्यावर या सामाजिक संगटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या उपस्थतीत गोर-सेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी गोर सेनेचे जिलाध्यक्ष अशोक चव्हाण,देवणीचे तालुकाध्यक्ष गुरूनात पवार,जिल्हा संघटक बालाजी राठोड,जिल्हा सह संघटक बालाजी पवार,संतोष पवार,शरद राठोड,दयानायक राठोड,महादेव जाधव,दयानंद राठोड,प्रकाश राठोड आदी देवणी तालुक्यातील गोर सेनेच्या तांड्यावरील कार्यकत्यांची उपस्थिती होती.